बैठी जीवनशैली, व्यायामाचा अभाव, रसायनयुक्त अन्नपदार्थांमुळे माणसाच्या शरीरातील अवयव निकामी होण्याच्या घटनांमध्ये दरवर्षी वाढ होत आहे. अवयव प्रत्यारोपणासाठी लागणारा शस्त्रक्रियांचा खर्च खाजगी रुग्णालयात लाखांच्या घरात पोहोचतो. यावर उपाय म्हणून मुंबईतील जे चे पुणे येथील ससून आणि नागपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी याबाबतचा निर्णय सोमवारी जाहीर केला.
सोमवारी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी जे जे रुग्णालयाला भेट दिली होती. जे जे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे बांधकाम, रुग्णालयातील सद्यस्थितीतील रुग्णसेवेचा आढावा, रुग्णांच्या शस्त्रक्रिया करता आवश्यक उपकरणांच्या खरेदीचा प्रस्ताव याबाबत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी रुग्णालय प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या. त्यावेळी जे जे सह पुण्यातील ससून आणि नागपूर येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया उपलब्ध होणार असल्याचे मुश्रीफ यांच्यावतीने सांगण्यात आले.
(हेही वाचा – Key Hole Surgery : सात महिन्यांच्या बाळाचे पोट फुगले, वर्षभरानंतर पोटातून पाण्याची गाठ काढली)
राज्यात मोठ्या संख्येने मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांची संख्या वाढत आहे. बऱ्याच रुग्णांना डायलिसिसच्या माध्यमातून तात्पुरत्या स्वरूपात उपचार उपलब्ध होतो. राज्यात नवीन मूत्रपिंड उपलब्ध होण्यासाठी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची वाट पाहणाऱ्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. खासगी रुग्णालयात यकृत आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा खर्च दहा लाखापर्यंत आकारला जातो. नामांकित खाजगी रुग्णालयात यकृत आणि मृत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रुग्णांकडून दहा लाखांपेक्षाही जास्त दर आकारला जातो.
Join Our WhatsApp Communityसरकारी आणि खाजगी रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचे समन्वय साधणाऱ्या विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या नोंदीत दर महिन्यात निकामी झालेल्या रुग्णांची प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी नोंदी वाढत आहे. रुग्णांच्या मागणीनुसार अपघाती मेंदूमृत रुग्णांच्या नातेवाईकांकडून अवयवदान फारसे होत नाही. समाजातील सर्व घटकांनी अवयवदानासाठी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असे आवाहन विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीने केले आहे.