जम्मू-काश्मीरच्या (JK Encounter) कुपवाडा जिल्ह्यातील माछाल सेक्टरमध्ये गुरुवारी (२६ ऑक्टोबर) सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. ही कारवाई अजूनही सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले आहे.
कुपवाडा (JK Encounter) पोलिसांनी दिलेल्या विशिष्ट माहितीच्या आधारे माछाल सेक्टरमध्ये चकमक सुरू झाली असून त्यात आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. घटनास्थळी सर्च ऑपरेशन चालू आहे. पुढील तपशील काही वेळात समजेल “, असे काश्मीर झोन पोलिसांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा – Share Market: जागतिक घडामोडींचा शेअर बाजारावर परिणाम, गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान)
तत्पूर्वी, जम्मू आणि काश्मीर (JK Encounter) पोलिसांच्या संयुक्त कारवाईत भारतीय लष्कराच्या जवानांनी कुपवाडा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बोलताना, भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने म्हटले आहे की, “#IndianArmy, @JmuKmrPolice आणि गुप्तचर यंत्रणांनी २६ ऑक्टोबर रोजी सुरू केलेल्या संयुक्त ऑपरेशनमध्ये, सतर्क सैनिकांनी #LoC च्या बाजूने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. कारवाई सुरू आहे. अधिक तपशीलाची प्रतीक्षा आहे.” (JK Encounter)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community