J&K: काश्मीरमध्ये 8 तासांत 2 बसमध्ये बाॅम्ब ब्लास्ट!

जम्मू काश्मीरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बुधवारी रात्री जम्मू काश्मीरच्या उधमपूर इथे एका बसमध्ये ब्लास्ट झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पहाटे आणखी एका बसमध्ये स्फोट झाला. त्यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने बसमध्ये कोणीही नव्हते, त्यामुळे जीवितहानी झाली नाही. मात्र, 8 तासांच्या आतच दोन बस स्फोटाने हादरल्याने संशय व्यक्त केला जात आहे. सध्या या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरु आहे.

या दोन्ही प्रकरणाची चौकशी केली जात आहे. अद्यापतरी जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. मात्र, यात दोघे जण जखमी झाले असल्याचे सांगितले जाते आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील दोमेल इथे ही घटना घडली. पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या बसमध्ये ब्लास्ट झाला. यात बसच्या चिंधड्या उडाल्या.

( हेही वाचा: …तर महापालिका निवडणुकीत शिंदे-ठाकरे दोघांनाही गमवावा लागेल पक्ष आणि चिन्ह – माजी निवडणूक आयुक्त )

अमित शहांचा दौरा रद्द 

28 सप्टेंबरला रात्री 10: 30 वाजता पहिला ब्लास्ट झाला. तर त्यानंतर 29 सप्टेंबर रोजी सकाळी 6 वाजता दुस-या एका बसमध्ये ब्लास्ट झाला आहे. अमित शहा यांचा 30 सप्टेंबरपासून जम्मू काश्मीर दौरा सुरु होणार होता. पण आता या दौ-यातही बदल करण्यात आला आहे. आता 3 ऑक्टोबरपासून अमित शहा जम्मू- काश्मीर दौ-यावर असणार आहेत. या दौ-यादरम्यान, वेगवेगळया कार्यक्रमांत ते सहभागी होणार आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here