जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात प्रशासनाची जोरदार मोहीम सुरु आहे. जम्मू- काश्मीर प्रशासनाने शनिवारी अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममधील लेवार गावात हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आमिर खान याच्या दुमजली इमारतीच्याभोवतीच्या मालमत्तेवर बुलडोझर चालवला. मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम नबी खान उर्फ आमिर खान हा हिजबुल मुजाहिद्दीनच्या टाॅप ऑपरेशन कमांडर आहे. तो 90 च्या दशकाच्या सुरुवातीला पाकव्याप्त काश्मीर ओलांडून पळून गेला होता. समोर आलेल्या माहितीनुसार, जम्मू- काश्मीर प्रशासनाने पहलगाम, अनंतनागमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी कमांडर आमिर खानची इमारत पाडली आहे.
( हेही वाचा: बारामतीत खाजगी क्लासच्या बसला अपघात; चालकासह २७ मुली जखमी )
Jammu and Kashmir Administration demolishes property of Hizbul Mujahideen terrorist commander Amir Khan, in Anantnag's Pahalgam pic.twitter.com/x1F28YFwAK
— ANI (@ANI) December 31, 2022
सरकारी जमिनीवरील बांधकाम पाडले
जम्मू-कश्मीर प्रशासनाच्या संयुक्त ऑपरेशन टीमने एका दंडाधिकार्यांच्या उपस्थितीत अनंतनाग जिल्ह्यातील लेवार गावात ही कारवाई केली. अतिक्रमण केलेल्या सरकारी जमिनीवर बांधलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर आमीर खानच्या मालमत्तेची कंपाउंड भिंत बुलडोझरने पाडली. कश्मीर खोऱ्याला दहशतवादमुक्त करण्यासाठी आणि सरकारवर लोकांचा विश्वास निर्माण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community