जेएनपीटीतील खारफुटीच्या भूखंडाचा जुगाड, पर्यावरणप्रेमींचा आरोप

105

जेएनपीटीच्या ताब्यातील खारफुटी वनविभागाच्या कांदळवन कक्षाला परत करण्याची गेली कित्येक वर्षे रखडलेली प्रक्रिया पुन्हा वादाच्या भोव-यात सापडली आहे. जेएनपीटीच्या ताब्यातील खारफुटीच्या जागेची संपूर्ण माहिती दिली जात नसल्याचा आरोप एकवीरा आई प्रतिष्ठानचे प्रमुख आणि पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी केला. जेएनपीटी विकासकामांच्या नावे खारफुटीचे जंगल नष्ट करुन उभारल्या जाणा-या प्रकल्पांनाही त्यांनी विरोध केला.

( हेही वाचा : कोकण रेल्वे सुसाट! १ मे पासून ‘या’ गाड्या धावणार विद्युतवेगाने… )

नुकतीच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जेएनपीटीच्या कर्मचा-यांसह आढावा बैठक घेतली. त्यावेळी जेएनपीटीने आपल्या ताब्यातील ८१५ हेक्टर भूखंडावरील जागा वनविभागाच्या कांदळवन कक्षाला तातडीने देण्यास मान्य केले. गुरुवारी महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग एप्लिकेशन सेंटर या प्रणालीच्या मदतीने आपल्याकडे केवळ ८८४.६६ हेक्टर भूखंडावर खारफुटी असल्याचा दावा जेएनपीटीने केला. ही माहिती खोटी असल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते नंदकुमार पवार यांनी केला. माहिती अधिकारातून जेएनपीटीनेच ९१२ हेक्टर भूखंडावर खारफुटी असल्याची माहिती दिल्याचे पवार म्हणाले. जेएनपीटीने याअगोदरही विकासकामांसाठी खारफुटी जाळल्याचा आरोप पवार यांनी केला. यात बंदरविस्तार प्रकल्प, रस्ते बांधणीसाठी खारफुटी जाळल्याचे आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही पवार यांनी केला.

संपूर्ण जागा सोडण्यासाठी जेएनपीटीचा नकार

८८४.६६ हेक्टर जागेतील ७०.३३ हेक्टर जागेचा ताबा सोडण्यास जेएनपीटीने नकार दिला. या जागेची विविध प्रकल्पांसाठी गरज असल्याची माहिती जेएनपीटीकडून कांदळवन कक्षाला दिली गेली.

  • १८.३७ हेक्टर जागेत एसईझेडवर आधारित बंदार जेटटीच्या रस्त्याचे विस्तारीकरण
  • ४३,४२ हॅक्टर जागेत सिडकोचा सागरी किनारा प्रकल्प, बेलपाडा ते जेएनपीटीतील उत्तरेतील प्रवेशद्वाराचा मार्ग
  • ०.३२ हॅक्टर जागेत जेएनपीटीतील फुंडा गावातील रस्ते रुंदीकरणातून भूमिगज वीजेच्या तारांच्या पाईपलाईनची उभारणी
  • ८.२२ हॅक्टर जागेत बंदराला संलग्न असलेल्या रस्त्याचे विस्तारीकरण. या प्रकल्पाला अगोदरच परवानगी दिली गेली आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.