आपल्या वादग्रस्त फतव्यांमुळे दररोज दारुल उलूम देवबंद चर्चेत असतात. देशातील मुस्लिमांना इस्लामिक शिक्षण देण्याच्या उद्देशाने, स्थापन झालेली ही संस्था वादात येण्याची ही पहिलीच वेळ नाही, अनेकवेळा ही संस्था आपल्या विचित्र फतव्यांमुळे चर्चेत आली आहे. मुस्लिमांच्या प्रश्नांची उत्तरे देताना, रोज नवनवीन फतवे काढले जातात. मुस्लिम लोक darulifta-deoband.com या साइटला भेट देतात. तिथे काही विचित्र प्रश्न विचारले जातात, मग त्यांना दारुल उलूम देवबंदकडून ज्ञान दिले जाते आणि फतवा जारी केला जातो. तसेच ज्यांनी प्रश्न विचारले आहेत, त्यांचं ते काम इस्लामच्यादृष्टीने हलाल की हराम हे सांगितलं जातं. आम्ही या साइटवरून काही प्रश्नांची मांडणी केली आहे, ज्यावर तुम्ही जारी केलेला फतवा वाचलात, तर तुम्हाला ते मजेशीर वाटतील आणि काही मागासलेल्या विचारसरणीमागे धर्माचे ठेकेदार कसे आहेत हे तुम्हाला समजेल.
देवबंदच्या दृष्टीने काय हलाल आणि काय हराम?
व्याजातून मिळणारा पगार हराम
प्रश्न : एका व्यक्तीने विचारले की, तो पेटीएममध्ये काम करतो आणि त्याला जो पगार मिळतो तो कंपनीला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून मिळणाऱ्या व्याजावर मिळतो, मग त्याचा पगार हराम की हलाल?
उत्तर : आता तुम्ही विचार करत असाल की, असा काय प्रश्न आहे हा? मात्र, दारुल उलूमने यावर गांभीर्याने विचार करत, प्रतिक्रिया दिली आहे. फतवा क्रमांक ८६६/८६४/बी=९/१४३८ नुसार, जर कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना आरबीआयकडून मिळणाऱ्या व्याजातून पगार देत असेल, तर तो हलाल नाही. दारुल उलूमने प्रश्नकर्त्याला चांगली नोकरी मिळाल्यानंतर ही नोकरी सोडण्याचा सल्ला दिला आहे.
(हेही वाचा गड-किल्ल्यांवरील मुसलमानांच्या अतिक्रमणाविरोधात एकवटले दुर्गप्रेमी! काय करणार पुढे?)
मोबाईलवरून चित्रीकरण हराम
प्रश्न : दुसरा प्रश्न असा आहे की, एखादी व्यक्ती कॅमेऱ्याने मोबाईलमध्ये फोटो काढू शकते का? मी त्यात व्हिडिओ बनवू शकतो का?
उत्तर : देवबंदच्या वतीने फतवा क्रमांक 1157/B=1335/B अंतर्गत, या प्रश्नाच्या उत्तरात, मोबाईल फोनचे काम संपर्क साधण्यासाठी आहे, असं सांगण्यात आलं. त्यामुळे मोबाईलचा वापर हा केवळ संवादासाठी करावा, पण जिवंत माणसाचे फोटो काढणे, फोटोग्राफी करणे इस्लाममध्ये नाही, त्यामुळे मोबाईलचा वापर फोटो काढण्यासाठी करु नये, तसेच व्हिडिओ फिल्म बनवणे हे दारुल उलूमच्या मते अजिबात योग्य नाही.
…तर काॅपी केलेली चालेल
प्रश्न : एकाने प्रश्न विचारला आहे की, कॉपी करून पास होणे किंवा अवैध आणि कोणत्याही कामातून पैसे कमवणे हे हराम की हलाल आहे?
उत्तर : या प्रश्नाच्या उत्तरात देवबंदने जारी केलेल्या फतवा क्रमांक 490/490=M/1429 नुसार, असे सांगण्यात आले की, कोणी काॅपी करुन पास झाला, तर ते चुकीचे आहे, पण त्यातून त्याला नोकरी लागली, पदवी मिळाली आणि त्याने त्याची जबाबदारी पार पाडली, तर ती काॅपी योग्य ठरेल, नाहीतर काॅपी केल्यामुळे त्याला पाप लागेल, असं त्या प्रश्नकर्त्याला सांगण्यात आलं.
महागडे कपडे घालणे चुकीचे
प्रश्न : एका मुलाने विचारले की तो ब्राॅकेड फॅब्रिक वर्क असलेली शेरवानी घालू शकतो का?
उत्तर : या प्रश्नावर देवबंदने २४४/२२६/एसडी=३/१४३९ असा फतवा जारी केला, की जर शेरवानी सिल्कची असेल आणि त्यावर चांदी किंवा सोन्याचा धागा वापरला नसेल, तर ती घालता येईल. निकाह समारंभात ते परिधान केले जाऊ शकते. परंतु कपडे खरेदीवर पैसे खर्च करणे आणि अभिमानाने ते परिधान करणे चुकीचे आहे. शरियानुसार इतके महागडे कपडे घालणे योग्य नाही.
(हेही वाचा रायगड, लोहगड आता कुलाबा किल्ला! बांधले थडगे, अंथरली हिरवी चादर…)
तर तो गुन्हेगार
प्रश्न : कोणीतरी विचारले की जर, तो रोज कॉलेजला जाऊ शकत नसेल, तर त्याच्या मित्रांकडून प्रॉक्सी हजेरी लावणे योग्य आहे का?
उत्तर : यावर देवबंदने फतवा क्रमांक ७९३/६७१/एन=७/१४३९ द्वारे सांगितले की, अशा प्रकारे बनावट हजेरी लावणे किंवा लादणे चुकीचे आहे. जो कोणी असे करतो तो गुन्हेगार आहे.
त्यांच्यासाठी ही गंभीर बाब
हे होते काही प्रश्न आणि उत्तरे जी आपल्याला दारूल लिफ्टा-देवबंदच्या साइटवर वाचायला मिळतात. या व्यतिरिक्त या साईटवर असे अनेक प्रश्न विचारले जातात जे सर्वसामान्यांना अगदी बालिश वाटतील. पण, इथे विचारणा-यासाठी ही एक गंभीर बाब आहे आणि दारुल उलूमनेही फतवा काढून अत्यंत गंभीरपणे उत्तर दिले आहे.
Join Our WhatsApp Community