पंजाब नॅशनल बँकेत परीक्षेविना नोकरी, ६७,००० रुपयांचा मिळेल घसघशीत पगार

143

सरकारी बँकेत नोकरी शोधणाऱ्यांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पंजाब नॅशनल बँकेने अधिकारी आणि व्यवस्थापक या पदांसाठी भरती सुरु केली आहे. विशेष म्हणजे यासाठी उमेदवारांना परीक्षेशिवाय नोकरी मिळवता येणार आहे त्यासाठी चक्क ६७ हजार रुपये इतका घसघशीत पगार मिळणार आहे.

बँकेने या भरतीसाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकृत वेबसाइट pnbindia.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट आहे. एकूण 103 पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट आहे.

(हेही वाचा रक्ताचा वारस म्हणून राजकीय वारस नसावा! आदित्य ठाकरेंवर केसरकरांचा हल्लाबोल)

पदांची माहिती

  • एकूण पदांची संख्या- 103
  • अधिकारी (अग्नि सुरक्षा) : 23 पदे
  • व्यवस्थापक (सुरक्षा) : 80 पदे

किती शैक्षणिक पात्रता हवी?

या भरती मोहिमेद्वारे अधिकारी (अग्नि सुरक्षा) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात बीईची पदवी असणे आवश्यक आहे. तसेच, व्यवस्थापकाच्या पदांसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा किती हवी?

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे. तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सवलत दिली जाईल.

निवड प्रक्रिया कशी असणार?

या पदांसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांना 1003 रुपये अर्ज शुल्क जमा करावे लागेल आणि SC/ST/PWBD श्रेणीसाठी अर्ज शुल्क रुपये 59 आहे. उमेदवारांची निवड मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.