Indian VFX Artist : हॉलीवूडच्या संपामुळे तब्बल १० हजार भारतीय VFX आर्टिस्टच्या डोक्यावर टांगती तलवार

215
Indian VFX Artist : हॉलीवूडच्या संपामुळे तब्बल १० हजार भारतीय VFX आर्टिस्टच्या डोक्यावर टांगती तलवार

हॉलीवूड चित्रपट सृष्टी (Indian VFX Artist) ही जगप्रसिद्ध चित्रपट सृष्टी म्हणून ओळखली जाते. मागील ११५ दिवसांपासून हॉलीवूडमधील लेखक आणि अभिनेते संपावर आहेत. त्यांच्या या संपामुळे भारतीय कलाकारांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत.

जास्त वेतन आणि कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वाढत्या वापराच्या विरोधात हॉलीवूडमध्ये (Indian VFX Artist) लेखक आणि अभिनेत्यांचा संप सुरु आहे. २ मेपासून सुरू झालेल्या लेखकांच्या संपाला ११५ दिवस पूर्ण झाले आहेत आणि १४ जुलैपासून सुरू झालेल्या कलाकारांच्या संपाला ४२ दिवस पूर्ण झाले आहेत. या संपामुळे मोठे प्रोडक्शन हाऊस बंद झाल्याने १० हजारांपेक्षा जास्त व्हीएफएक्स आणि कॉम्प्युटर ग्राफिक्स(सीजी) कलाकारांचे रोजगार संकटात आले आहेत. सुमारे २ लाखांपेक्षा जास्त कर्मचारी, कलाकार, लेखक आणि तंत्रज्ञांच्या या ऐतिहासिक संपामुळे अमेरिकी टीव्ही आणि चित्रपट उद्योग पूर्णपणे ठप्प झाला आहे. या संपामुळे सुमारे ११ लाख कोटी रुपयांची कामे ठप्प झाली आहेत.

डम्बो मूव्हीचे व्हीएफएक्स कलाकार (Indian VFX Artist) राहिलेले प्रांजल पंचसारा म्हणाले, अनेक प्रोडक्शन हाऊसची कामे भारतीयांशिवाय चालत नाहीत. या संपामुळे लहान कलाकारांना फटका बसत आहे. त्यामुळे आता भारतीय व्हीएफएक्स अार्टिस्ट कामासाठी युरोपीयन सिनेमा प्रोडक्शन हाऊसशी संपर्क साधत आहेत.

(हेही वाचा – Manipur Violence : आसाम मध्ये मणिपूरच्या हिंसाचाराची सुनावणी ; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश)

व्हीएफएक्स कलाकारांना ३ महिन्यांपासून काम नाही

ॲव्हेंजर्स आणि थॉरसारख्या प्रोजेक्टवर (Indian VFX Artist) काम करणारे हरसिमरतसिंग कौर म्हणाले की, भारतीयवंशाचे व्हीएफएक्स आर्टिस्ट आणि भारतीय व्हीएफएक्स उद्योगावर वाईट परिणाम झाला आहे. हजारो व्हीएफएक्स आणि ॲनिमेशन आर्टिस्टना ३ महिन्यांपासून कामं मिळालेली नाहीत.

भारतात व्हीएफएक्स इंडस्ट्री (Indian VFX Artist) झपाट्याने वाढली आहे. हाॅलीवूडचे सर्व मोठे प्रोडक्शन हाऊस भारतीय वंशाच्या व्हीएफएक्स कलाकारांवर अवलंबून आहेत. ते आपले अनेक प्रकल्प भारतीय व्हीएफएक्स उद्योगाकडून आऊटसोर्सही करतात. ११५ दिवसांच्या या संपामुळे अनेक अमेरिकी टीव्ही शोचे काम बंद झाले आहेत. यामध्ये एंडोर, स्ट्रेंजर थिंग्ज, द लास्ट ऑफ अस, येलो जॅकेट, द हँडमेड्स टेल, ब्लेड रनर २०९९चा समावेश आहे. भारतीय व्हीएफएक्स कलाकार व ॲनिमेटर्सची हॉलीवूडमध्ये खूप जास्त मागणी आहे. हॉलीवूड व्हिज्युएल इफेक्टसाठी भारतीय प्रज्ञेला प्राधान्य दिले जात आहे.

२०१८ मध्ये ऑस्कर जिंकणाऱ्या वाली द शेप ऑफ वॉटर, मार्व्हल चित्रपटाचे ॲव्हेंजर्स, थोर : रेग्नारोक याशिवाय हॉलीवूड ब्लॉक बस्टर्स फेट ऑफ फ्युरियस, हेंडमेडस टेल, स्त्रेक, ग्रॅव्हिटी, अवतार, मेलेफिसिएंट आणि इंटरस्टेलरमध्ये भारतीय व्हीएफएक्स कलाकारांनी (Indian VFX Artist) काम केले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.