जो बायडेन (Joe Biden Security Lapse) डेलावेरच्या विल्मिंग्टनम येथे रविवारी (१७ डिसेंबर) एका कार्यक्रमातून परतत असताना, एक फिकट तपकिरी रंगाची फोर्ड कार त्यांच्या ताफ्याला येऊन धडकली. त्या कारचा चालक पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता आणि यादरम्यान त्याने राष्ट्राध्यक्षांच्या गाडीला धडक दिली. या अपघातानंतर बायडेन यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या चालकाला ताब्यात घेतले.
(हेही वाचा – Ayodhya Raam Mandir: श्रीराम मंदिरात स्थापन होणार सोन्याच्या पादुका, वाचा वैशिष्ट्यपूर्ण माहिती…)
जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी सुरक्षित
असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जो बायडेन (Joe Biden Security Lapse) आणि त्यांची पत्नी जिल सुरक्षित आहेत. अपघातानंतर ते दोघेही विल्मिंग्टन येथील आपल्या घरी सुरक्षित परतले. अपघातानंतर, जो बायडेनच्या सुरक्षेत गुंतलेल्या सिक्रेट एजंट्सनी त्वरित कारवाई केली. सिक्रेट एजंट्सनी त्यांच्या बंदुका त्या गाडीच्या चालकाकडे रोखून धरल्या.
BREAKING: A car has crashed into President Joe Biden’s parked motorcade in Wilmington, Delaware, leaving Biden “shocked.”
According to the Daily Mail, Biden’s Secret Service agents pulled their guns on the driver who rammed into one of the SUVs.
The man who was driving the car… pic.twitter.com/AgDknqHgl2
— Collin Rugg (@CollinRugg) December 18, 2023
(हेही वाचा – Zee – Sony Merger : विलिनीकरणाची मुदत वाढवण्याची झी एंटरटेनमेंटची सोनीला विनंती )
व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, जो बायडेन (Joe Biden Security Lapse) यांनी विल्मिंग्टन येथील मुख्यालयातून रात्री ८:०७ वाजता प्रस्थान केले. जो बायडेन यांनी एका पत्रकाराच्या प्रश्नाचे उत्तर दिल्यानंतर थोड्याच वेळात, डेलावेर लायसन्स प्लेट असलेल्या एका वाहनाने त्यांना धडक दिली.
जो बायडेन यांच्या कारचे नुकसान
ज्या सिल्व्हर सेडान कारला धडक देण्यात आली होती, तिच्या बंपरचे अपघातानंतर नुकसान झाले. त्यानंतर लगेचच सुरक्षा रक्षकांनी गाडीला वेढा घातला. एजंट्सनी कार चालकाला वेढा घातला आणि चालकाकडे शस्त्रे रोखून धरली आणि त्याला ताब्यात घेतले. या सर्व प्रकारानंतर जो बायडेन यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. (Joe Biden Security Lapse)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community