प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे जबरदस्त फिल्ममेकर John Carpenter

180
हॅलोवीन, द फॉग अशा चित्रपटांद्वारे त्यांनी प्रेक्षकांच्या अंगावर जणू काटा आणला. सत्तरीच्या दशकापासून ते आजपर्यंत त्यांनी अफलातून चित्रपट दिले आहेत. हॉरर, ऍक्शन आणि सायन्स फिक्शन हा त्यांचा प्रमुख जॉनर आहे. त्यांचे नाव आहे John Carpenter. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९४८ रोजी न्यूयॉर्क येथे झाला.
कार्पेंटर यांनी लहानवयातच चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. द थिंग्स फ्रॉम अनदर वर्ल्ड, गॉडझिला आणि फोरबिडन प्लॅनेट अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. हाय स्कूल संपण्याआधीच त्यांनी शॉर्ट हॉरर फिल्म शूट करायला सुरुवात केली. १९६९ दरम्यान त्यांनी ८ मिनिटांचा कॅप्टन व्हॉयर हा लघुपट लिहिला आणि दिग्दर्शित केला. पुढे त्यांनी १९७८ ला हॅलोवीन हा चित्रपट तयार केला.
प्रत्यक्ष चित्रपट क्षेत्रात नाम कमावण्याआधी त्यांनी अनेक शॉर्ट फिल्म्स तयार केल्या. त्यांनी ऍक्शन्स फिल्म्स केल्या असल्या तरी ते खासकरुन हॉरर चित्रपटांसाठी ओळखले जातात. हॅलोवीन, द फॉग, एस्केप फ्रॉम न्यू यॉर्क, स्टारमॅन हे त्यांचे सुरुवातीचे चित्रपट खूप गाजले आणि फिल्ममेकर म्हणून त्यांनी स्वतःची एक वेगळी शैली निर्माण केली.
डार्क स्टार, असॉल्ट ऑन प्रेसिंक्ट १३, द थिंग, क्रिस्टीन, बिग ट्रबल इन लिटल चायना, प्रिन्स ऑफ डार्कनेस, दे लाईव्ह,  इन द माउथ ऑफ मॅडनेस  असे भयपट पुष्कळ चालले. पुढे त्यांनी आपली हॅलोवीन सीरिज पुन्हा आणली. २०१८ मध्ये पुन्हा हॅलोवीन या नावाने चित्रपट काढला. हॅलोवीन किल्स २०२१ मध्ये आला आणि हॅलोवीन एंड्स २०२२ मध्ये प्रदर्शित झाला. या सिक्वेलचे संगीतकार आणि कार्यकारी निर्माता म्हणून त्यांनी काम पाहिले.
त्याचबरोबर त्यांनी व्हॅम्पायर्स, लॉस्ट थीम्स, लॉस्ट थीम्स २, लॉस्ट थीम्स ३ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांना गुंतवून ठेवले. २०१९ च्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये त्यांना गोल्डन कोच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक आघाडीचे भयपट चित्रपट प्रेक्षकांसाठी आणले. असं म्हटलं जातं की आजही लोक त्यांचे चित्रपट एकट्याने पाहत नाही आणि हीच आहे प्रेक्षकांनी दिलेली त्यांना अप्रतिम दाद.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.