जॉन्सन बेबी पावडर बाजारातून कायमस्वरुपी बंद, एफडीएची कारवाई…

143

गुणवत्ता मानांकन चाचणीत फोल ठरल्याने अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन एण्ड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या जॉन्सन्स बेबी पावडरच्या उत्पादनाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. पावडरमधील अपेक्षित प्रमाण योग्य नसल्याने पावडरला अप्रमाणित घोषित करण्यात आले. गेल्या कित्येक वर्षांपासून जॉन्सन बेबी पावडरच्या गुणवत्तेबाबत शंका व्यक्त केली जात होती. अखेर या वादावर अन्न व औषध प्रशासनाने पावडरीचे उत्पादन बंद करण्याचा निर्णय घेतला. पावडरीचे उत्पादन कमी दर्जाचे असताना कंपनीवरही कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबईतील औषध नियंत्रण प्रयोगशाळेत पावडरचे दोन नमुने तपासले. चाचणी अहवालात पावडरमधील पीएच प्रमाण असंतुलित असल्याचे जाहीर करण्यात आले. या अहवालानंतर अन्न व औषध प्रशासनाने जॉन्सन बेबी पावडरचे बाजारातील उत्पादन परत घेण्याच्या सूचना जॉन्सन एण्ड जॉन्सन्स या कंपनीला दिल्या होत्या. या आदेशानंतर कंपनीने अहवालावर आक्षेप नोंदवला. कंपनीने केंद्रीय औषध प्रयोगशाळेकडे बेबी पावडरच्या उत्पादनाची गुणवत्ता चाचणी करण्याची मागणी केली. केंद्रीय औषध प्रयोगशाळेच्या कोलकाता शाखेनेही पावडर उत्पादनाची गुणवत्ता चाचणी केली. कोलकाता येथील केंद्रीय औषध प्रयोगशाळेनेही पीएच पातळी अप्रमाणित असल्याचे घोषित केले. केंद्रीय प्रयोगशाळा तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नाशिक व पुणे येथील औषध निरीक्षकांच्या देखरेखीत गुणवत्ता चाचणीतही पीएच पातळी अप्रमाणित असल्याचे सिद्ध झाले. या सर्व प्रक्रियेनंतर अन्न व औषध प्रशासनाने मुलुंड येथील जॉन्सन्स एण्ड जॉन्सन्स कंपनीच्या उत्पादन कारखान्यातील पावडर उत्पादनाचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला.

( हेही वाचा: याआधी शिवसेनेची दसरा मेळाव्याची ‘तोफ’ शिवाजी पार्कमध्ये कितीवेळा थंडावलेली? )

कारवाईची मागणी

ऑल इंडिया फूड अँड ड्रग असोसिएशनने जॉन्सन्स अँड जॉन्सन्सच्या पावडर उत्पादनाच्या दर्ज्याविरोधात अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीच्या आधारावर अन्न व औषध प्रशासनाने पावडरच्या उत्पादनाची चाचणी केली होती. आता कंपनीच्या सर्व उत्पादन कारखान्यांवर धडक कारवाई करुन अन्न व औषध प्रशासनाने पावडरचे उत्पादन रोखणे आवश्यक असल्याची मागणी असोसिएशनचे प्रमुख अभय पांडे यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.