कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्न आणि अलमट्टी धरण वादाबाबत बैठक होणार आहे. कोल्हापुरात 4 नोव्हेंबर रोजी ही बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनंतर ही बैठक महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेळगाव सीमावाद आणि अलमट्टी धरणाबाबतच्या वादावर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सीमावादाचा तिढा लवकरच सुटणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक
4 नोव्हेंबर रोजी होणा-या या बैठकीला कर्नाटक आणि महाराष्ट्राचे राज्यपाल,संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकारी देखील हजर राहणार असल्याचे समजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेवरुन ही बैठक होणार असल्याने या बैठकीला एक विशेष महत्व प्राप्त झाले आहे. दोन्ही राज्यांची संयुक्त बैठक होणार आहे. ज्वलंत अशा बेळगाव सीमावाद, अलमट्टी धरणातील पाणी वाटपावरुन होणा-या वादावर देखील या बैठकीत चर्चा होणार आहे.
(हेही वाचाः ‘…तर भाजपनेही बक्कळ पैसा कमावला असता’, फडणवीसांच्या ट्वीटची होतेय चर्चा)
या मुद्द्यांवर होणार चर्चा
सीमावादाच्या प्रश्नावर दोन्ही राज्यांकडून सविस्तर चर्चा या बैठकीत होणार आहे. सीमावादाचा हा विषय कसा हाताळायचा, दोन्ही राज्यांध्ये या वादाबाबत कसा समन्वय साधायचा याबाबत देखील या बैठकीत चर्चा होणार आहे. तसेच कर्नाटकातील हत्तींच्या धुमाकूळाने सीमाभागातील शेतक-यांना देखील त्रास होतो, त्याबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे.
Join Our WhatsApp Community