अकोला प्रिटींग प्रेस चालवणा-या ज्येष्ठ पत्रकाराची आत्महत्या; म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी …’

133

अकोल्यात प्रिंटींग प्रेस चालवणा-या ज्येष्ठ पत्रकाराने आत्महत्या केली. विशेष म्हणजे सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला न्याय देतील. अकोला शहरातल्या अकोट फाईल परिसरात राहणारे प्रभाकर गंगाराव विरघट हे पत्रकार असून, प्रिंटिंग प्रेस चालवत होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी असून, आपल्या दोन मुलांसोबत राहत होते. पण 10 ऑगस्टला मुलगा प्रतुल काकाकडे रात्री झोपण्यासाठी गेला असता, आजारी असलेल्या विरघट यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.

3 सुसाईड नोट

यानंतर अकोट फाईल पोलिसांना विरघट यांच्या मुलाने याबाबतची माहिती दिली. अकोट पोलिसांनी पंचनामा केला असता, पत्रकार प्रभाकर विरघट यांच्या खिशात तीन चिठ्या सापडल्या. एका चिठ्ठीत प्रिंटींग प्रेसमध्ये फसगत केली आणि विश्वासघाताने आर्थिक अडचणीत आणले, त्यांना शिक्षा व्हावी, असा उल्लेख आहे.

दुस-या चिठ्ठीत शहरातल्या कौलखेड येथील शिवशक्ती प्रिंटींग प्रेसमधील व्यवहारात 1988 मध्ये रमेश सरने, मोहन काजळे, मदन जोशी, प्रभाकर जोशी, रमेश गायकवाड, रमेश जैन, प्रेम कनोजीया, मोतीलालजी कनोजीया यांनी फसगत केली, विश्वासघात केला आर्थिक अडचणीत ठेवले, असा आरोप करण्यात आला आहे. आपल्याला गुन्हेगार केले म्हणून, आत्महत्या करत आहे, असंही त्यांनी नमूद केले आहे.

( हेही वाचा: दिलासादायक बातमी; CNG आणि PNG च्या दरात मोठी कपात )

मुख्यमंत्र्यांनी मला न्याय द्यावा

तसेच, तिस-या चिठ्ठीत मुख्यमंत्री शिंदे सरकारने मला मृत्यूनंतर न्याय द्यावा. आठ जणांनी आपला विश्वासघात केला म्हणून, आत्महत्या करत आहे. या सर्वांवर कारवाई व्हावी, अशी मागणी करत आयुष्य संपवलं आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर विरघट यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीनुसार, अकोट फेल पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. सध्या पुढील तपास अकोट फाईल पोलीस करत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.