- ऋजुता लुकतुके
जेएसडब्ल्यू इन्फ्रा ही कंपनी शेअर (JSW Infra Share Price) बाजारातील उतार चढावांचं प्रतीक ठरावी अशी आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये कंपनीने ५२ आठवड्यातील नीच्चांकी किंमत १४१ इतकी नोंदवली होती. आणि तीच कंपनी एका वर्षाच्या आत जुलै २०२४ मध्ये ५२ वर्षांचा उच्चांक ३३६ रुपयांना स्पर्श करून आली आहे.
गेल्या आठवड्यात कंपनीने नवकार कॉर्पोरेशनमध्ये मोठी हिस्सेदारी घेतल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर शेअरमध्ये मोठी उसळी दिसून आली होती. गेल्या शुक्रवारी हा शेअर ३३६ रुपयांना स्पर्शून आला. नवकार कॉर्पोरेशनच्या शेअरमध्येही त्यामुळे १० टक्के वाढ झाली. जेएसडब्ल्यू इन्फ्राची एक उपकंपनी जेएसडब्ल्यू पोर्ट अँड लॉजिस्टिक्सने नवकारमधील ७७ टक्के हिस्सा विकत घेतला आहे. यापूर्वी हा हिस्सा कंपनीच्या प्रमोटर्सकडे होता. (JSW Infra Share Price)
(हेही वाचा- America : महाराष्ट्रातील तरुणाचा अमेरिकेच्या ग्लेशियर नॅशनल पार्कमधील तळ्यात बडून मृत्यू!)
या बातमीनंतर शेअर जवळ जवळ आठवडाभर हिरव्या रंगात होता. पण, नवीन आठवड्यात थोडी नफारुपी विक्री या शेअरमध्ये दिसून येत आहे. त्यामुळेच शुक्रवारी बाजार बंद होताना हा शेअर ३.५ अंशांनी घसरून ३३९ रुपयांवर बंद झाला. (JSW Infra Share Price)
जेएसडब्ल्यू इन्फ्रा ही कंपनी पायाबूत सुविधा उभारणीच्या क्षेत्रात देशातील आघाडीची कंपनी आहे. आणि सध्या बंदर विकास प्रकल्पात कंपनी रस घेत आहे. तर नवकार कॉर्पोरेशन ही बंदर प्रकल्पात लॉजिस्टिक्सचं काम पाहते. कार्गो हाताळणी, मोठ्या कंटेनरची साठवणूक, बंदरातील सामान रेल्वे मार्गांनी इतर शहरांत पोहोचवणे, अशी कामं ही कंपनी करते. त्यामुळे जेएसडब्ल्यू कंपनीसाठी पूरक सेवा ही कंपनी पुरवणार आहे. (JSW Infra Share Price)
मार्च २०२४ ला संपलेल्या तिमाहीत जेएसडब्ल्यू इन्फ्रा कंपनीने आपला निव्वळ नफा ३२९ कोटी रुपये इतका असल्याचं शेअर बाजाराला कळवलं आहे. (JSW Infra Share Price)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community