मालकाच्या घरात केली 54 लाखांची चोरी; नोकरीवरुन काढल्याच्या रागातून चोरी

150

मालकाने कामावरुन काढल्याच्या रागातून मालकाच्या घरातून 54 लाखांची चोरी करणा-या नोकरासह त्याच्या साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सतिश सुरेश शिवगण आणि अंकुश मोंडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी मालकाने जुहू पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर, जुहू पोलिसांनी आरोपींचा कसून शोध घेत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

अशी केली चोरी

फिर्यादी हे जेष्ठ नागरिक असून व्यावसायिक आहेत. गुन्ह्यातील मुख्य आरोपी ही फिर्यादी यांच्या बंगल्यात नोकर म्हणून काम करत होता. काही कारणामुळे मालकाने नोकराला काढून टाकले होते. या गोष्टीचा राग मनात धरुन नोकराने मित्राच्या मदतीने मालकाच्या घरात चोरी करण्याचा कट रचला. आरोपीला मालकाच्या घरातील सगळं माहित असल्याने, त्याने चोरीची योजना आखत 16 जून रोजी मालक बाजारात गेले असताना, डुप्लीकेट चावीने दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने घेऊन पसार झाला.

( हेही वाचा: Presidential Election 2022: द्रौपदी मुर्मूंनी दाखल केला उमेदवारी अर्ज )

आरोपीला ठोकल्या बेड्या

कोणताही पुरावा नसताना, तक्रार नोंदवल्यानंतर, जुहूचे सहपोलीस निरिक्षक विजय धोत्रे आणि त्यांच्या पथकाने जुहू आणि आसपासच्या परिसरातील 100 हून अधिक सीसीटीव्ही स्कॅन करुन, तसेच सीडीआर व डम डाटाचा तांत्रिक तपास करुन एका संशयित इसमास ताब्यात घेतले. चौकशी केली असता, त्याने चोरी केल्याची कबुली दिली.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.