सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘लष्कर ए तोयबा’ या अतिरेकी संघटनेच्या संपर्कात असलेल्या एका संशयित तरुणाला पुणे दहशतवाद विरोधी पथकाने अटक केली होती. जुनैद मोहम्मद असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. अतिरेकी संघटनांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपाखाली जुनैदवर कारवाई करण्यात आली आहे. दापोडी परिसरातून जुनैदला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात मंगळवारी, २४ मे रोजी हजर करण्याल आले. त्यानंतर जुनैदला ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली. जुनैदच्या चौकशीत त्याने १० जणांना दहशतवादी संघटनेत भरती केल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
जुनैदच्या चौकशीतून उघड झाली
जुनैद मोहम्मद याने महाराष्ट्र, झारखंड, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी प्रोत्साहित केल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीतून समोर आले आहे. तसेच जुनैदने जम्मू-काश्मीरमध्ये काही जणांना दहशतवादी संघटनेत सहभागी केले होते. त्यानंतर ही मुले लष्करी कारवाईत मारली गेली, अशी धक्कादायक माहितीही जुनैदच्या चौकशीतून उघड झाली आहे. ATSच्या अटकेत असलेल्या जुनैदने १० जणांना दहशतवादी संघटनेत भरती केले. ATS च्या सूत्रांची ही माहिती आहे. १० जणांपैकी काही जण मारले गेले, काही जणांना अटक झाली. जुनैदला पुणे ATSने ताब्यात घेतले आहे, सध्या तो पोलीस कोठडीत आहे.
(हेही वाचा केरळमधील पीएफआयच्या मोर्च्यात हिंदुविरोधी प्रक्षोभक घोषणा)
Join Our WhatsApp Community