पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते, या परिक्रमेत पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास लागणाऱ्या वेळेमुळे २१ जून रोजी १३ तास १३ मिनिटांचा दिवस असतो. २१ जूनपासून उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. दरवर्षी २१ जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. हा दिवस १३ तास १३ मिनिटांचा आहे. २१ जूनला ‘Summer Solstice’ असे देखील म्हटले जाते.
सर्वात मोठा १३ तास १३ मिनिटांचा दिवस
पृथ्वी साडेअकरा अक्षवृत्त हजार किलोमीटर प्रति तासाच्या गतीने पश्चिमेकडून पूर्व दिशेला फिरते. यासोबतच पृथ्वी आपल्या कक्षेतून १ लाख ५ हजार किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किलोमीटर लंबवर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील जसा मोठा दिवस असतो, तसाच वर्षातील सर्वात लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायणाला सुरुवात होत असते.
( हेही वाचा : ‘बेस्ट’च्या ताफ्यात दाखल होणार पहिली इलेक्ट्रिक AC डबल डेकर बस!)
२००४ मध्ये दक्षिण भारतात जी त्सुनामी झाली, त्यामुळे पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा मायक्रो सेकंदाने कमी झाला. पृथ्वीचा फिरण्याचा वेग हा कमी होत चालल्याने ठराविक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय घडीत लीप सेकंद अॅडजस्ट करावा लागतो. १९७२ मध्ये सर्वात प्रथम लीप सेकंद अॅडजस्ट केला होता. इंटरनॅशनल अर्थ रोटेशन अॅण्ड रेफरन्स सिस्टीम सर्व्हिस ही आंतरराष्ट्रीय संघटना लीप सेकंद अॅडजेस्ट करते. ३० जूनच्या मध्यरात्री किंवा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री लिप सेकंद ऍडजेस्ट केला जातो. काही देशांत २१ जून हा दिवस एखाद्या सणासारखा देखील साजरा केला जातो. पृथ्वी आपल्या कक्षेतून एक लाख पाच हजार किमी प्रति तास वेगाने सुमारे ८९ कोटी ४० लाख किमी लंब वर्तुळाकार कक्षेत सूर्याची परिक्रमा करते. वर्षातील २१ जून जसा मोठा दिवस असतो तसाच वर्षातला लहान दिवस २२ डिसेंबर असतो. या दिवसापासून दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होत असते.