‘हे’ होणार देशाचे 50वे सरन्यायाधीश! वाचा कोण आहेत चंद्रचूड?

142

सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच देशाचे सरन्यायाधीश म्हणून आता न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. देशाचे 50वे सरन्यायाधीश होण्याचा मान चंद्रचूड यांना मिळणार आहे. बुधवारी राष्ट्रपती भवनात होणा-या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या चंद्रचूड यांना राष्ट्रपती पदाची शपथ देणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश उदय लळीत निवृत्त होत असल्यामुळे आता त्यांच्या जागी चंद्रचूड हे सरन्यायाधीश पदाची धुरा सांभाळणार आहेत.

लळीत यांची निवृत्ती

सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश उदय लळीत हे बुधवारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या जागी धनंजय चंद्रचूड यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मंगळवारी निरोप घेताना सरन्यायाधीश उदय लळीत हे फारच भावूक झाले होते. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या पाय-यांवर नतमस्तक होऊन निरोप घेतला. 27 ऑगस्ट 2022 रोजी उदय लळीत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 49वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली होती. त्यांनी सरन्यायाधीश म्हणून 74 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

कोण आहेत चंद्रचूड?

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1959 रोजी झाला. चंद्रचूड यांची जून 1998 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. 13 मे 2016 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती देण्यात आली. समलैंगिक संबंधांमध्ये गुनेहेगार ठरवणे,आधार योजनेच्या वैधतेशी संबंधित प्रकरणे,शबरीमाला प्रकरण,नौदलात महिला अधिका-यांना कायमस्वरुपी अधिकार देणे अशआ महत्वपूर्ण निर्णयांमध्ये चंद्रचूड यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

वडीलही होते सरन्यायाधीश

चंद्रचूड यांचे वडील यशवंत चंद्रचूड यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून प्रदीर्घ असा कार्यकाळ भूषविला आहे. यशवंत चंद्रचूड यांनी तब्बल 7 वर्षे 4 महिने सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासातील आजवरचा त्यांचा सर्वात मोठा कार्यकाळ आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.