देशातील सर्वोच्च न्यायसंस्था असलेल्या सरन्यायाधीशपदी महाराष्ट्राचे सुपूत्र उदय लळीत यांची नियुक्ती झाली आहे. लळीत यांनी शनिवारी शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी लळीत यांना शपथ दिली.
लळीत हे महाराष्ट्रातील दुसरे सरन्यायाधीश आहेत. रमण्णा यांच्यापूर्वी नागपूरचे शरद बोबडे हे सरन्यायाधीश होते. सर्वोच्च न्यायालयाचे ते 49वे सरन्यायाधीश आहेत. त्यांचा कार्यकाळ अवघा 74 दिवसांचा असेल. 13ऑगस्ट 2014 रोजी लळीत यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती झाली होती. वकिलीतून थेट सर्वोच्च न्यायालयावर नियुक्ती होणारे न्यायमू्र्ती लळीत हे दुसरे सरन्यायाधीश आहेत.
( हेही वाचा: चाकरमानी निघाले गावाक; मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी )
कोकणचे सुपूत्र
न्यायमूर्ती उदय लळीत हे महाराष्ट्रातील कोकणचे सुपूत्र आहेत. सिंधुदुर्गच्या देवगड तालुक्यातील गिर्ये- कोठारवाडी हे त्यांचे मूळ गाव. त्यांचे आजोबा वकिलीनिमित्त सोलापूरला स्थायिक झाले. वडील उमेश लळीत हे 1974 ते 1976 या काळात उच्च न्यायालयात न्यायमूर्ती होते. 9 नोव्हेंबर 1957 रोजी न्यायमूर्ती उदय लळीत यांचा जन्म झाला. मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केले.
Join Our WhatsApp Community