कबीर बेदी (Kabir Bedi) हे ज्येष्ठ अभिनेते असून त्यांनी विविध चित्रपट अणि नाटकांमधून अभिनय केला आहे. कबीर बेदी यांचा पंजाब प्रांतातील लाहोर येथे १६ जानेवारी १९४६ रोजी एका पंजाबी खत्री शीख कुटुंबात झाला. त्यांचे वडील बाबा प्यारे लाल सिंह बेदी हे लेखक आणि तत्त्वज्ञ होते. त्यांची आई फ्रेडा बेदी ही एक ब्रिटीश महिला होती.
बेदी (Kabir Bedi) यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली. कबीर बेदी यांनी शेक्सपियरच्या ऑथेलो नाटकात काम केले आहे. त्याचबरोबर त्यांनी नाटकांमधून अनेक महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ६० हून अधिक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. खून भरी मांगमधली त्यांनी नकारात्मक भूमिका खूपच गाजली होती. ताजमहाल: ऍन इटर्नल लव्ह स्टोरीमध्ये त्यांनी बादशाह शाहजहानची भूमिका साकारली. या भूमिकेसाठी त्यांचे खूप कौतुक झाले.
(हेही वाचा Ayodhya Ram Mandir : श्रीराममंदिरात कोणती मूर्ती स्थापन करणार? अखेर निर्णय झाला…)
जेम्स बॉंडपटातील ऑक्टोपसीमध्ये त्यांनी व्हिलनची भूमिका चांगलीच वठवली. त्यांनी युनायटेड स्टेट्स आणि युरोपमधल्या चित्रपट व मालिकांमध्येही अभिनय केला आहे. ते भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय अभिनेते होते. त्यांनी हॉलिवुडपटांमध्ये काम करायला सुरुवात केली आणि विशेष म्हणजे युरोपमध्ये ते स्टार कलाकार झाले. बेदी टाइम्स ऑफ इंडिया, तेहेलका या नियतकालिकांत लेख देखील लिहायचे.
Join Our WhatsApp Community