कढई पनीर ही अशी डिश आहे, जी तुम्ही फक्त दुपारच्या जेवणातच नाही तर रात्रीच्या जेवणातही खाऊ शकता. ही रेसिपी खायला जितकी स्वादिष्ट आहे तितकीच बनवायलाही सोपी आहे. टोमॅटो आणि मसाल्यांनी तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये पनीरचे तुकडे आणखीन चव वाढवतात. दह्यामुळे ग्रेव्हीला थोडी तिखट चव येते. ही रेसिपी तुम्ही चपाती किंवा नानासोबत सर्व्ह करू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसा बनवायचा चविष्ट कढाई पनीर… (Kadai Paneer Recipe)
(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा – CM Eknath Shinde)
घटक
- 250 ग्रॅम पनीर
- 3 कांदे
- 2 शिमला मिरची
- आद्रक,लसूण पेस्ट
- 2 टोमॅटो
- 1 टेबलस्पून धना,जीरा पावडर
- 1-1.5 टेबलस्पून लाल तिखट
- 4-5 काजू
- 1 टेबलस्पून किचन किंग मसाला
- चिमुटभर हळद
- 1/2 टेबलस्पून जीरे
- 2-3 तमालपत्र
- चिरलेली कोथिंबीर
- 1 टेबलस्पून कसुरी मेथी
- गरजे नुसार पाणी
- चवीनुसार मीठ
कृती
- प्रथम पनीर चे मिडीयम आकाराचे तुकडे करून घ्यावेत.त्यानंतर एक कांदा व शिमला मिरची मिडीयम आकाराचे कापून घ्यावेत (एका कांद्याचे चार भाग करून त्याचे पडदे काढून घ्यावेत). त्यानंतर उरलेले दोन कांदे व टोमॅटो लांबट चिरून घ्यावेत.
- पनीर च्या क्यूब ना अर्धा चमचा लाल तिखट व थोडेसे मीठ टाकून चांगल एकजीव करावे. व दहा मिनिट ठेवून द्यावे.
- एका कढई मध्ये थोडेसे तेल गरम करून त्यामध्ये शिमला मिरची व कांदा दोन ते तीन मिनिट शेलॉ फ्राय करून घ्यावा.
- शेलो फ्राय झाल्यानंतर कांदा व शिमला मिरची एका प्लेट मध्ये काढून घ्यावे. व त्याच कढई मध्ये थोड तेल टाकून पनीर चे तुकडे पाच मिनिट शेलों फ्राय करावे.हे करताना माझ्या पनीर चे तुकटे कढई ला चिटकत होते.त्यापेक्षा तुम्ही पनीर चे तुकडे गोल्डन रंग होईपर्यत फ्राय करू शकता.
- त्यानंतर त्याच कढईमध्ये थोड तेल टाकून दोन कांदे,टोमॅटो व तीन ते चार काजू गोल्डन होईपर्यत भाजून घ्यावे. व गोल्डन कलर आल्यावर अद्रक लहसुन पेस्ट टाकून चांगल भाजून घ्यावे.हे करताना माझी अद्रक लहसुन पेस्ट कढईला चिटकली होती.तुम्ही चार ते पाच लहसुन पाकळ्या व अर्धा इंच अद्रक् चा तुकडा टाकून त्यातच फ्राय करा. व हे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्या.
- एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जीरा व तमालपत्र टाका.जीरा तडतडल्यावर त्या मध्ये लाल मिरची पावडर टाका.गॅस चा फ्लेम थोडा स्लो ठेवा. त्यानंतर या मध्ये तयार वाटण टाकून चांगल तेल सुटेपर्यंत परतून घ्या. व त्यामध्ये हळद,मीठ आणि धना जीरा पावडर टाका.
- हे मिश्रण चांगल शिजल्यानंतर यामध्ये भाजलेल्या कांदा व शिमला मिरची चे काप टाकून चांगले परता. व दोन मिनिटानंतर त्यामध्ये पनीर चे तुकडे टाका. व चांगल एकजीव करा.
- यानंतर यामध्ये आवशक्तेनुसार पाणी टाका. मी एक ग्लास पाणी टाकले होते. त्यानंतर दोन ते तीन मिनिट झाकण लावून शिजवून घ्या. व त्यानंतर त्यामध्ये कसुरी मेथी,किचन किंग मसाला व चवी नुसार मीठ टाका. व वरतून कापलेली कोथिंबीर टाका. व भाजी शिजल्यावर चांगली एकजीव करून गॅस बंद करा.
- आपली पनीर कढाई ची रेसिपी खाण्यासाठी तयार आहे.ही भाजी तुम्ही चपाती, नानसोबत खाऊ शकता. (Kadai Paneer Recipe)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community