कल्याण येथे इमारतीत शिरला बिबट्या; हल्ल्यात दोन नागरिक जखमी

कल्याण पूर्वेकडील चिंचवाडा येथील विठ्ठलवाडीत गुरुवारी सकाळी बिबट्या शिरला. रस्त्यावरील दोन जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने परिसरात धुमाकूळ माजला. या घटनेनंतर बिबट्याने नीलम अपार्टमेंट या इमारतीत प्रवेश केला. मात्र इमारतीतील रहिवाशांनी प्रसंगावधान दाखवून दरवाजे बंद केले.

कल्याण पूर्वेला बिबट्या कसा आला, याबाबत नेमकी अजून कोणालाच माहिती नाही. परंतु बिबट्याच्या हल्ल्यात दोन नागरिक जखमी झाल्याने परिसरात सकाळपासून भीतीचे होते. कल्याणमधील चिंचपाडा येथील रहिवासी इमारतीत गुरूवारी बिबट्या घुसला होता. यावेळी त्याने केलेल्या हल्ल्यात दोन जण जखमी झाले. अखेर ६ तासांच्या प्रयत्नानंतर वनाधिकाऱ्यांनी बिबट्याला पकडले.

( हेही वाचा: SBI Fraud: स्टेट बॅक ऑफ इंडियाची मागच्या पाच वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटी रुपयांची फसवणूक )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here