कमाल आर खानला अटक; वादग्रस्त ट्वीटप्रकरणी मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

164

स्वयंघोषित चित्रपट समिक्षक आणि अभिनेता कमाल आर. खान याला मालाड पोलिसांनी अटक केली आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. मुंबई विमानतळावर पोहोचताच त्याला पोलिसांनी अटक केली. केआरकेला बोरिवली न्यायालयात हजर केलं जाईल, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

युवासेनेचे सदस्य राहुल कनाल यांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. अटकेनंतर केआरकेला मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.

( हेही वाचा: दसरा मेळाव्यावरुन ठाकरे गट – शिंदे गटात रस्सीखेच; मनसेने लगावला टोला )

काय आहे प्रकरण?

केआरके हा सोशल मीडियावर नेहमी वादग्रस्त वक्तव्य करत असतो. पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केआरकेने एका प्रसिद्ध व्यक्तीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्याने ट्वीटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केले. त्यामुळे त्याच्याविरोधात मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केआरके भारतात नव्हता. तो भारतात परत येण्याची वाट पोलीस बघत होते. दोन वर्षानंतर कमाल आर खान मुंबई एअरपोर्टवर पोहोचला, याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळाली. त्यानंतर एक विशेष पथक मुंबई पोलिसांनी एअरपोर्टवर पाठवले. त्यानंतर पोलिसांनी कमाल आर खानला ताब्यात घेतले. सोमवारी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्याला अटक करण्यात आली. आता कमाल आर खानला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.