अमेरिकेच्या इतिहासात भारतीय वंशाच्या पहिल्या ‘महिला’ अध्यक्ष

75

अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडेन हे पुढील काही काळासाठी तात्पुरत्या स्वरूपात उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांच्याकडे सत्ता हस्तांतरित करणार आहेत. कोलोनोस्कोपीसाठी बायडेन यांना भूल देण्यात येईल आणि या काळात ते अमेरिकेच्या घटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडण्याच्या स्थितीत नसतील. यामुळे उपराष्ट्रपती कमला हॅरिस या जबाबदारी स्वीकारणार आहेत. अमेरिकेच्या इतिहासात अध्यक्षपदाची सत्ता सांभाळणाऱ्या कमला हॅरिस या पहिल्या महिला आहेत, त्या भारतीय वंशाच्या आहेत.

उपराष्ट्रपती सांभाळणार कारभार

वॉशिंग्टनच्या बाहेरील वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटलमध्ये बायडेन यांचे वार्षिक शारीरिक उपचार सुरू आहेत. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जेन साकी यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, घटनेत ठरविलेल्या प्रक्रियेप्रमाणे अध्यक्ष जो बायडेन हे ऍनेस्थेसियाखाली असताना काही काळासाठी उपराष्ट्रपतींना अधिकार हस्तांतरित करतील. तसेच, उपराष्ट्रपती यावेळी पश्चिम विभागातील कार्यालयातून काम करतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी कोलोनोस्कोपी केली होती तेव्हाही अध्यक्षीय अधिकार उपाध्यक्षांना हस्तांतरित केले होते.

( हेही वाचा : एमएसएमईला मदत करण्यासाठी सिडबी आणि गुगल एकत्र )

पहिल्या महिला राष्ट्रपती

अमेरिकेच्या जवळपास २५० वर्षांच्या इतिहासात आजवर एकही महिला राष्ट्रपती झालेली नाही. त्यामुळे अध्यक्षपदाची जबाबदारी पहिल्यांदाच महिलेकडे जाणार आहे. तर, राष्ट्रपती झाल्यानंतर प्रथमच जो बायडेन यांची तपासणी होणार आहे. यापूर्वी, बायडेन यांच्या प्रकृतीबाबतचे शेवटचे अपडेट डिसेंबर २०१९ मध्ये समोर आले होते. तेव्हा त्यांचे वय ७७ वर्षे होते. ते निरोगी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.