हिंदी लेखक कमलेश्वर (Kamaleshwar) हे विसाव्या शतकातील सर्वात श्रेष्ठ लेखक मानले जातात. कथा, कादंबरी, पत्रकारिता, स्तंभलेखन, चित्रपटाची स्क्रिप्ट इत्यादी अनेक प्रकारांमध्ये त्यांनी आपली लेखणी यशस्वीपणे चालवली आहे. त्यांच्या लेखनाला विविध छटा होत्या.
त्यांनी ‘कितने पाकिस्तान’ ही कादंबरी असो किंवा भारतीय राजकारणावर भाष्य करणारा ‘आँधी’ हा चित्रपट असो, कमलेश्वर (Kamaleshwar) यांची लेखन प्रतिभा उत्कृष्ट होती. त्यांनी मुंबईत केलेली टीव्ही पत्रकारिता खूप महत्त्वाची मानली गेली आहे. कमलेश्वर यांचा जन्म ६ डिसेंबर १९३२ रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात झाला. त्यांनी १९५४ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी साहित्यात एम.ए. केले.
(हेही वाचा River Pollution : महाराष्ट्रातील सर्वाधिक नद्या आहेत प्रदूषित; मिठीसह कोणत्या नद्या बनल्यात धोकादायक?)
त्यांनी चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिल्या, त्याचबरोबर त्यांच्या कादंबऱ्यांवर आधारित चित्रपटही बनवले गेले. ‘आंधी’, ‘मौसम, ‘सारा आकाश’, ‘रजनीगंधा’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘सौतन’, ‘लैला’, ‘राम-बलराम’ या चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या. ‘चंद्रकांता’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेचे लेखन देखील त्यांनी केले आहे.
‘दर्पण’ आणि ‘एक कहानी’ सारख्या मालिकांच्या स्क्रिप्ट्सही कमलेश्वर यांनीच लिहिल्या होत्या. त्यांनी अनेक माहितीपट आणि कार्यक्रमांचे दिग्दर्शनही केले आहे. कमलेश्वरांच्या अनेक कथांचा उर्दूमध्ये अनुवादही झाला आहे. २००५ मध्ये कमलेश्वर यांना ‘पद्मभूषण’ आणि २००३ मध्ये ‘कितने पाकिस्तान’ (कादंबरी) साठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘सारिका’, ‘धर्मयुग’, ‘जागरण’ आणि ‘दैनिक भास्कर’ यांसारख्या प्रसिद्ध वृत्तपत्रांचे आणि मासिकांचे ते संपादकही होते. कमलेश्वर यांनी त्यांच्या ७५ वर्षांच्या आयुष्यात १२ कादंबऱ्या, १७ कथासंग्रह आणि सुमारे १०० चित्रपटांच्या स्क्रिप्ट लिहिल्या आहेत.
Join Our WhatsApp Community