K.S. Nissar Ahmed : कन्नड साहित्यिक के. एस. निसार अहमद

180
के. एस. निसार अहमद (K.S. Nissar Ahmed) यांचे पूर्ण नाव कोक्करे होसाहल्ली शेख हैदर निसार अहमद असे होते. ते कन्नड भाषेतील भारतीय साहित्यिक होते. त्यांचा जन्म ५ फेब्रुवारी १९३६ रोजी बंगळुरू ग्रामीणमधील देवनहल्ली येथे झाला. त्यांचे वडील सरकारी कर्मचारी होते. असे म्हणतात की त्यांची मातृभाषा उर्दू होती. मात्र पुढे जाऊन सरकारी नोकरी मिळावी म्हणून, मुस्लिम वस्तीतील सगळी मुलं उर्दू माध्यमात शिकत असूनही त्यांच्या वडिलांनी त्यांना कन्नड माध्यमाच्या शाळेत दाखल केले.
त्यांच्या शाळेतील शिक्षण साहित्यिक जी.पी. राजरथनम आणि एम.व्ही. सीतारामय्या हे त्यांचे आदर्श होते. त्यांनी जिओलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री प्राप्त केली. तसेच त्यांनी गुलबर्गा येथील म्हैसूर माईन्स आणि जिओलॉजीमध्ये सहाय्यक भूगर्भशास्त्रज्ञ म्हणून काम केले होते. त्याचबरोबर त्यांचा साहित्यिक प्रवासही सुरु झाला होता.
ते नित्योत्सव या साहित्यिक रचनेसाठी ते प्रसिद्ध आहेत. नित्योत्सव गाणे पुढे खूप प्रसिद्ध झाले. या गाण्याचा इतका प्रचार झाला की कर्नाटकातील आबालवृद्धांच्या ओठी त्यांचेच गाणे होते. त्यांनी एकूण १३ अल्बम प्रकाशित झाले आहेत. १९८४ ते १९८७ दरम्यान ते कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते. १९५९ मध्ये दसरा सणाच्या वेळी कन्नड कवींच्या संमेलनात त्यांना आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हाच त्यांच्या साहित्याचा प्रवास सुरु झाला होता.
अहमद (K.S. Nissar Ahmed) यांना त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री, राज्योत्सव पुरस्कार आणि पंपा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांचे शब्द सर्वसामान्यांच्या मनाचा ठाव घेणारे असतात, त्याचबरोबर एक वेगळीच शैली आणि प्रतिभा त्यांना प्राप्त असल्यामुळे लोकांच्या ह्रदयाचा ठाव घेणे त्यांना शक्य झाले. ३ मे २०२० रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.