भारताला विश्वविजेता होण्याचा विश्वास देणारा अद्भुत कर्णधार Kapil Dev

61
भारताला विश्वविजेता होण्याचा विश्वास देणारा अद्भुत कर्णधार Kapil Dev
भारताला विश्वविजेता होण्याचा विश्वास देणारा अद्भुत कर्णधार Kapil Dev

आज भारत क्रिकेटमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. पण एक काळ होता, जेव्हा भारताकडे विचित्र नजरेने पाहिलं जायचं. भारत कधी क्रिकेटमध्ये विश्वविजेता होईल असं कुणालाच वाटलं नव्हतं. पण ते स्वप्न दाखवलं एक अद्भुत कर्णधाराने. त्या कर्णधाराचं नाव आहे कपिल देव. (Kapil Dev)

(हेही वाचा- येणारा काळ Uddhav Thackeray साठी कठीण!)

१८८३ चा विश्वचषक जिंकून आपण कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली इतिहास रचला. आज ६ जानेवारी कपिल देव यांचा जन्मदिन. चला तर त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया… (Kapil Dev)

कपिल देव हे भारतीय क्रिकेटमधील एक महान व्यक्तिमत्त्व आहेत. ते गोलंदाज आणि फलंदाजही होते. ६ जानेवारी १९५९ रोजी चंदीगड येथे या महान क्रिकेटवीराचा जन्म झाला. ते क्रिकेटच्या इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक म्हणून ओळखले जातात. (Kapil Dev)

कसोटी सामने:

कपिल देव यांनी भारतासाठी १३१ कसोटी सामने खेळले, त्यांनी ५,२४८ धावा केल्या आणि ४३४ बळी घेतले. कसोटी क्रिकेटमध्ये ४०० हून अधिक बळी घेणारे आणि ५,००० हून अधिक धावा करणारे ते एकमेव खेळाडू आहेत. (Kapil Dev)

(हेही वाचा- Manmohan Singh : काँग्रेसच्या उलट्या बोंबा!)

एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI):

त्यांनी २२५ एकदिवसीय सामने खेळले, ३,७८३ धावा केल्या आणि २५३ बळी घेतले. (Kapil Dev)

विश्वचषक:

कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने १९८३ मध्ये भारतासाठी पहिला विश्वचषक जिंकला, हा एक ऐतिहासिक क्षण होता, ज्याने भारतीय क्रिकेटचे जग कायमचे बदलले आणि आपणही विश्वविजेता होऊ शकतो, हा विश्वास निर्माण झाला. त्यानंतर आपण मागे वळून पाहिलं नाही. मात्र दुसरा विश्वचषक जिंकण्यासाठी कर्णधार धोनीची वाट पाहावी लागली. (Kapil Dev)

रेकॉर्ड:

देव यांच्या नावावर एक महत्त्वाचा रेकॉर्ड आहे. एकदिवसीय सामन्यांमध्ये ५ व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा खाली फलंदाजी करायला येऊनही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या (१७५*) करण्याचा विक्रम (२०२३ पर्यंत) आहे. (Kapil Dev)

(हेही वाचा- भारतीय युद्धनौका INS Tushil सेनेगल भारतात दाखल)

पुरस्कार:

कपिल देव यांना १९८२ मध्ये पद्मश्री आणि १९९१ मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००२ मध्ये त्यांना विस्डेनने भारतीय क्रिकेटर ऑफ द सेंच्युरी म्हणून घोषित केले. (Kapil Dev)

कपिल देवची आक्रमक खेळण्याची शैली, प्रेरणादायी नेतृत्व आणि क्षेत्ररक्षणामुळे ते भारतीय क्रिकेटमधील एक प्रिय व्यक्ती बनले. आज त्यांचा जन्मदिन. महान खेळाडू कपिल देव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा… (Kapil Dev)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.