देशभरात 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. 1999 च्या कारगिल युद्धात भारतीय सैन्यांनी रणांगणात पाकिस्तानी सैन्याचा धुव्वा उडवला. हा दिवस सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद असाच आहे. कारगिलचे हे युद्ध 60 दिवस चालले आणि 26 जुलै 1999 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव करुन भारतियांचा ऊर अभिमानाने भरुन गेला. भारतीय लष्कराच्या या विजयाला ऑपरेशन विजय असे नाव देण्यात आले. मातृभूमिचे रक्षण करताना 500 हून अधिक भारतीय जवानांनी बलिदान दिले. त्याचवेळी, युद्धादरम्यान, 3 हजार हून अधिक पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवादी मारले गेले.
( हेही वाचा: राज ठाकरे म्हणाले, दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं )
या दिवशी देशभरात कारगिल विजय दिवस साजरा केला जात आहे. 23 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी 26 जुलै रोजी भारताच्या शूर जवानांनी देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देऊन पाकिस्तानी घुसखोर दहशतवादी आणि सैनिकांना कारगिलमधून हुसकावून लावले होते. या विशेष प्रसंगी वीरगती प्राप्त केलेल्या शूर पुत्रांचे स्मरण करुन दरवर्षी 26 जुलै रोजी विजय दिवस साजरा केला जातो. आजचा दिवस ऑपरेशन विजयच्या यशाचे प्रतीक मानला जातो. 1999 मध्ये मे ते जुलै या कालावधीत भारत आणि पाकिस्तानमध्ये यु्द्ध झाले.