कर्नाटकमध्ये सुरू असलेल्या हिजाब प्रकरणावरून देशभरात वेगवेगळे पडसात उमटताना दिसताय. या प्रकरणाच्या वादाला सोमवारी उच्च न्यायालयात वेगळ रूप मिळाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कर्नाटकातील मुस्लिम विद्यार्थीनींची हिजाबवरील मागणी वाचून, तुम्हीही व्हाल थक्क हे नक्की. हिजाब वापरण्याच्या समर्थनासाठी राज्य सरकारच्या आदेशाला न्यायालयात आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यां मुलींनी ‘‘आपल्याला गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्यास परवानगी द्यावी’’, अशी विनंती न्यायालयात केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची सुनावणी न्यायालयाने मंगळवापर्यंत स्थगित केली आहे. उडुपी येथील सरकारी कनिष्ठ महाविद्यालयात शिकणाऱ्या मुलींनी ही याचिका दाखल केली आहे.
काय केली मुलींनी विनंती
आम्ही सरकारच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही, तर गणवेशाच्या रंगाचाच हिजाब वापरण्याची परवानगी आम्हाला मिळावी, असा सकारात्मक आदेश देण्याची विनंती करीत आहोत, असे याचिकाकर्त्यां मुलींची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितले. याचिकाकर्त्यां विद्यार्थिनींनी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती रीतुराज अवस्थी यांच्या नेतृत्वाखालील न्यायमूर्ती जे. एम. काझी आणि न्यायमूर्ती कृष्णा एम. दीक्षित यांच्या पूर्णपीठापुढे गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्यास परवानगी देण्याची विनंती केली.
(हेही वाचा – ‘टाटा’नं ‘एअर इंडिया’चा ताबा घेतल्यानंतर प्रवशांना दिलं ‘हे’ पहिलं बंपर गिफ्ट!)
हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ चे उल्लंघन
तसेच, अॅड. कामत यांनी न्यायालयात असा दावा केला की, केंद्रीय शिक्षण मंडळांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळा मुस्लीम मुलींना शालेय गणवेशाच्या रंगाचे हिजाब घालण्याची परवानगी देतात. कनार्टकातही ती दिली जाऊ शकते. हिजाब परिधान करणे ही एक आवश्यक धार्मिक प्रथा आहे आणि त्याच्या वापरावर बंदी घालणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद २५ चे उल्लंघन ठरते.
Join Our WhatsApp Community