दौंड, कलबुर्गी येथे MSRTC बसला फासलं काळं, महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांची बस सेवा तात्पुरती बंद; काय आहे कारण?

129

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणारी आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या msrtc एसटी बसची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी जत तालुक्यातील गावांची मागणी केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, तणावाचे वातावरण निवळेपर्यंत दोन्ही राज्यांनी बस सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या बसवर दौंड याठिकाणी शाई फेक करण्यात आली तर महाराष्ट्राच्या एसटी बसला कलबुर्गी येथे काळं फासण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर वाद अधिक चिघळू नये म्हणून महाराष्ट्र-कर्नाटक या दोन्ही राज्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून बस सेवा तात्पुरती बंद केली आहे.

(हेही वाचा – ‘या’ भागातील बंद बस सेवेमुळे खासदार संतापल्या, PMPML च्या प्रशासनाला सवाल)

काय आहे प्रकरण?

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील जत तालुक्यातील काही गावांवर आपला दावा केला त्यानंर महाराष्ट्रातील सर्व पक्षातील नेत्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर दोन्ही राज्य आमने-सामने आले आहेत. दरम्यान, दौंड येथील मराठा महासंघाचे कार्यकर्त्यांनी कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी-औरंगाबाद एसटीला काळे फासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. दौंडमधून जाणाऱ्या कर्नाटक एसटीवर जय मल्हार आणि जाहीर निषेध असा मजकूर लिहिण्यात आला. तसेच कानडी भाषेतील मजकूर काळे फासण्यात आले. तसेच मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याविरोधात घोषणाही दिल्यात.

यासह कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची अक्कलकोट-अफझलपूर बस थांबवून बसवर काळी शाई फेकली. बसवर बेळगाव आमचेच, अक्कलकोट, जत आमचेच, महाराष्ट्राचा धिक्कार असो असे लिहिलेली पोस्टर लावली. या प्रकऱणामुळे दोन्ही राज्यातील सेवा बंद कऱण्यात आली. मात्र या निर्णयामुळे नोकरी, उद्योगाच्या निमित्ताने कर्नाटक -महाराष्ट्रात दररोज येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.