कर्नाटक बागलकोटमधील रुग्णालयात शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या टीमने एका रुग्णाच्या पोटातील तब्बल १८७ नाणी काढली. दयामाप्पा हरिजन नामक ५८ वर्षीय व्यक्तीवर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. सर्वांसाठीच हा कुतूहलाचा विषय बनला असून आता सोशल मिडियावर सर्वत्र या घटनेची चर्चा होताना दिसत आहे.
( हेही वाचा : कोविड काळातील कंत्राटी परिचारिकांना मोठा दिलासा; आरोग्य विभागाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय)
रुग्णाच्या पोटातून काढली १८७ नाणी
संबंधित रुग्णाला शस्त्रक्रिया करण्यापूर्वी पोट फुगणे, पोटदुखी, उलट्या होणे असे अनेक त्रास होत होते. त्यामुळे डॉक्टरांनी सर्वसाधारण तपासणी केल्यावर पेशंटचा एक्स-रे आणि एन्डोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. एक्स-रे मध्ये रुग्णाच्या पोटात बरीच नाणी एकत्र जमा झाली असल्याचे निदर्शनास आले आणि डॉक्टरांच्या टीमने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली अन् रुग्णाच्या पोटातून १८७ नाणी काढण्यात आली.
मानसिक रुग्ण
यापैकी ५६ नाणी ५ रुपयांची, ५१ नाणी २ रुपयांची तर १ रुपयांची तब्बल ८० नाणी होती. दयामाप्पा हे ५८ वर्षीय मानसिक रुग्ण असून गेल्या ३ ते ४ महिन्यांमध्ये त्यांनी ही सगळी नाणी हळूहळून करून गिळली अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.
रुग्णाला जास्त जाणवू लागाला, ओटीपोटी सूज येणे, वेदना होणे असह्य झाले तेव्हा दयमाप्पा यांना रुग्णालयात आणण्यात आले. एक्स-रे काढल्यावर संबंधित स्थितीबाबत कुटुंबियांना माहिती मिळाली. दरम्यान आम्हाला याबाबत काहीही माहिती नव्हती, त्यांची मानसिक स्थिती चांगली नव्हती परंतु ते दैनंदिन काम व्यवस्थित करत होते अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे.
पोटात जागोजागी नाणी
दयामाप्पा यांनी नाणी खाल्ल्याचे कोणालाही सांगितले नव्हते, काही दिवसांपूर्वी पोट फुगले आणि झोपताना त्यांना वेदना होऊ लागल्या त्यामुळे हे एक आव्हानात्मक प्रकरण असल्याचे डॉ. ईश्वर कलबुर्गी यांनी स्पष्ट केले. त्यांच्या पोटात जागोजागी नाणी होती, ऑपरेशन थिएटरमध्ये सीआरच्या माध्यातून ही नाणी दिसत होती असेही त्या म्हणाल्या.
Join Our WhatsApp Community