कर्नाटकच्या ‘ हिजाब ‘ प्रकरणात निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींना संरक्षण प्रदान करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे. रविवारी माध्यमांशी बोलताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, ‘Y’ वाय प्रकारचे सुरक्षा कवच ‘ हिजाब ‘ प्रकरणात निकाल देणाऱ्या तिन्ही न्यायमूर्तींना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक यांना सर्व निर्देश देण्यात आले असून, तक्रारींचा ते तपास करतील. काही लोकांकडून न्यायमूर्तींना धमक्या प्राप्त झाल्या असून, हा विषय समोर ठेवून सुरक्षा कवच देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
आरोपी अटकेत
कर्नाटक राज्यात हिजाबवरुन सुरु झालेला वाद न्यायालयात गेला आणि न्यायालयाने शाळा महाविद्यालयांमध्ये हिजाब बंदीचा निर्णय दिला. ज्या न्यायमूर्तींनी हा निर्णय दिला त्यांना धमकी देण्यात आली होती. या न्यायाधीशांना धमकी देणा-या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
( हेही वाचा: महाराष्ट्राला काश्मीरची साद! )
व्हिडीओ व्हायरल
कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये गुरुवारी निदर्शनादरम्यानची अशीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) ऑडिटींग कमिटीचे सदस्य कोवई रहमथुल्ला हे म्हणाले की ‘चुकीचा’ निर्णय देणार्या न्यायाधीशाची झारखंडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या करण्यात आली आहे. आमच्या समाजात काही भावनिक लोक आहेत. तसंच न्यायाधीशांना धमकी देत तो म्हणाला की, “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर काही झालं तर…भाजप आम्हाला दोष देण्यासाठी तयार आहेच.”
Join Our WhatsApp Community