कर्नाटकच्या एका महाविद्यालयापासून सुरु झालेल्या हिजाब बंदीच्या वादाचे पडसाद संपूर्ण देशभर उमटले. नंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आणि त्यावर सुनावणी झाली. या सुनावणीत कर्नाटक सराकरने हिजाब बंदीचा निर्णय दिला. आता याबाबतीत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा निकाल देणाऱ्या न्यायाधीशांनाच धमकी देण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे.
आरोपी अटकेत
कर्नाटकातील उच्च न्यायालयाने 15 मार्च रोजी हिजाब बंदीवर निर्णय दिला होता. आता हा निर्णय देणा-या न्यायाधिशांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या न्यायाधीशांना धमकी देणा-या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. कोवई रहमतुल्लाह, तर एस. जमाल मोहोम्मद उस्मानी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
( हेही वाचा :24 महिन्यांत 36 इमारती विकत घेतल्या, सोमय्यांचा जाधवांवर आरोप! )
…तर भाजप आम्हाला दोष देईल
कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाविरोधात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. तमिळनाडूच्या मदुराईमध्ये गुरुवारी निदर्शनादरम्यानची अशीच एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या क्लिपमध्ये तामिळनाडू तौहीद जमात (TNTJ) ऑडिटींग कमिटीचे सदस्य कोवई रहमथुल्ला हे म्हणाले की ‘चुकीचा’ निर्णय देणार्या न्यायाधीशाची झारखंडमध्ये मॉर्निंग वॉक दरम्यान हत्या करण्यात आली आहे. आमच्या समाजात काही भावनिक लोक आहेत. तसंच न्यायाधीशांना धमकी देत तो म्हणाला की, “कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जर काही झालं तर…भाजप आम्हाला दोष देण्यासाठी तयार आहेच.”
Join Our WhatsApp Community