कर्नाटकातील एका महाविद्यालयातील काही विद्यार्थिनींनी भगवा स्कार्फ परिधान करून मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात बुरखा घालण्याची परवानगी देण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाचा निषेध केला. मुस्लिम विद्यार्थीनींना जर बुरखा घालून वर्गात येण्याची परवानगी असेल, तर आम्ही गळ्यात भगवा स्कार्फ घालून येऊ शकतो, असे या विद्यार्थ्यांनी सांगितले. कर्नाटकातील कोप्पा जिल्ह्यातील बालागडी गावातील एका महाविद्यालयात हे आंदोलन करण्यात आले.
हिंदू विद्यार्थ्यांनी केला विरोध
जर मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात बुरखा घालण्याची परवानगी दिली जाऊ शकते, तर आम्हाला गळ्यात भगवा स्कार्फ घालण्यास काहीच हरकत नसावी, असे हिंदू विद्यार्थ्यांनी सांगितले. कॉलेज व्यवस्थापनाने वारंवार नकार देऊनही मुस्लिम मुली बुरखा घालण्याच्या हट्टावर कायम आहेत. त्यामुळे हिंदू विद्यार्थ्यांनीही भगव्या रंगाचा स्कार्फ घालून येण्याचा निर्णय घेतला.
( हेही वाचा: जशास तसे! भारतीय जवानांचे चीनला चोख प्रत्युत्तर )
तीन वर्षांपूर्वीही घडला होता असाच प्रकार
तीन वर्षांपूर्वी हाच मुद्दा ऐरणीवर आल्यावर कॉलेज प्रशासनाने हस्तक्षेप करून हे प्रकरण हाताळले. पुढील आठवड्यात पालक आणि विद्यार्थ्यांच्या बैठकीत या विषयावर निर्णय घेतला जाईल, असे कॉलेज प्रशासनाचे म्हणणे आहे. तसेच विद्यार्थ्यांना हवे ते कपडे घालण्याची परवानगी असल्याचेही काॅलेज प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हिंदू विद्यार्थ्यांची जशास तशी भूमिका
कॉलेजच्या प्राचार्या अनंता मूर्ती म्हणाल्या, सगळे छान चालले होते, मात्र काही विद्यार्थी अचानक गळ्यात भगवा स्कार्फ घालून वर्गात आले. त्यांनी मुस्लिम विद्यार्थिनींच्या पेहरावावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अशीच एक घटना कर्नाटकातील उडपी येथील एका महाविद्यालयात घडली. या प्रकरणात एका मुस्लिम मुलीला वर्गात बुरखा घालण्यापासून रोखण्यात आले.
Join Our WhatsApp Community