कहरच ना राव! कर्ज दिलं नाही म्हणून पठ्यानं चक्क बँकच पेटवली

82

आपल्याला हवं ते मिळालं नाही, तर आजकाल कोण काय करेल ते सांगता येत नाही. असे अनेक प्रकार आपल्या कानांवर पडलेच असतील. पण आता तर एका पठ्ठ्याने चक्क बॅंकेने कर्ज देण्यास नकार दिला म्हणून बॅंकेलाच आग लावली आहे. कर्नाटकातील हावेरीमध्ये एका व्यक्तीने बॅंकेने कर्ज देण्यास नकार दिला म्हणून बॅंक पेटवून दिली. कर्जाचा अर्ज फेटाळल्यामुळे संतप्त होऊन त्याने हे कृत्य केले आहे.

आरोपीची कबूली

कागिनेली पोलिसांनी आरोपी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसेच, भारतीय दंड संहितेच्या कलम 436, 477 आणि 435 अंतर्गत गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या वृत्तानुसार, पोलिसांनी अटक केले्ल्या आरोपीकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, त्याला कर्जाची गरज होती आणि त्यासाठी तो बॅंकेत गेला होता. मात्र, कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर बॅंकेने त्या व्यक्तीला कर्ज देण्यास नकार दिला. यामुळे संतप्त होऊन त्याने बॅंकेला लाग लावली .

म्हणून फेटाळला अर्ज

33 वर्षीय वसीम हजरतसाब मुल्लाने हेडीगोंडा येथील कॅनरा बॅंकेच्या शाखेत कर्जासाठी अर्ज केला होता. वसीमचा सीआयबीआयएल स्कोअर कमी असल्याने कर्जाचा अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यामुळे संतप्त होऊन त्याने  रात्री उशिरा बॅंकेत पेट्रोल ओतून पेटवून दिले.

( हेही वाचा :हा संप नाही तर दुखवटा! एसटी कर्मचा-यांची वेदना )

असा घडला प्रकार

कर्ज नाकारल्याने निराश झालेला वसीम रात्री बॅंकेत पोहोचला आणि खिडकी तोडून त्याने आत प्रवेश केला. त्यानंतर पेट्रोल ओतून बॅंक पेटवून दिली. काही वेळाने धूराचे लोट पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरड केली. त्यानंतर घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दल पोहोचले. आरोपी गावातून पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलीसांनी त्याला पकडले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.