पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेमध्ये बदल करण्यात आले असून पहिल्यांदाच पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी देशी श्वानांचा समावेश करण्यात येणार आहे. कर्नाटकातील मुधोळ हाऊंड हा देशी प्रजातीचा शिकारी श्वान आता पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या ताफ्यात समाविष्ट होणार आहे. पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप(SPG)मध्ये या श्वानाचा समावेश होणार आहे.
दोन श्वानांची निवड
25 एप्रिल रोजी दोन डॉक्टर आणि सैनिकांचा समावेश असलेले एसपीजीचे एक पथक कर्नाटकातील तिम्मापूर येथील कॅनाईन रिसर्च अँड इन्फॉर्मेशन सेंटर येथे दाखल झाले होते. या सेंटरमध्ये मुधोळ हाऊंड श्वानांची प्रजाती असून या पथकाने दोन मेल मुधोळ हाऊंडना ताफ्यात घेतले आहे. त्यामुळे ही प्रजाती एसपीजी पथकात समावेश करण्यात आलेली पहिली देशी श्वानांची प्रजाती ठरली आहे. पोलिस अधीक्षक कार्यालयाशी संपर्क साधल्यानंतर ही कार्यवाही करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
(हेही वाचाः मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना दोन, मग आम्हाला एक का? शेलारांचा भर सभागृहात सवाल)
या श्वानांचे दोन महिन्यांपूर्वीच प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून चार महिने हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर सुरक्षेसाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण या श्वानांना देण्यात येणार आहे.
मुधोळ हाऊंडची वैशिष्ट्ये
या देशी प्रजातीच्या श्वानांचा शिकारी शिकारीसाठी वापर करत आहेत. दुबळं, लांब शरीर आणि लहान डोकं ही या प्रजातीची वैशिष्ट्ये आहेत. या श्वानांची गंध घेण्याची क्षमता ही इतर श्वानांपेक्षा सर्वाधिक आहे. तसेच या श्वानांची धावण्याची क्षमता सर्वाधिक असून ते लगेच थकत नाहीत. त्यांचं वजन साधारणपणे 20 ते 22 कि.ग्रॅ. असून त्यांची उंची 72 सेमी.पर्यंत असते.
Join Our WhatsApp Community