मशिदींवरील भोंग्यांच्या राज ठाकरेंच्या भाषणानंतर महाराष्ट्रातील राजकारण पेटले आहे. मनसेच्या नेत्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा लावायला सुरुवात केली आहे. आता कर्नाटकातही असेच काहीसे पाहायला मिळत आहे. कर्नाटकातील श्रीराम सेना आणि बजरंग दल या हिंदू संघटनांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात आवाज उठवला आहे.
तर स्पिकरवर भजने लावू
ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घालावी, अशी मागणी श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिक यांनी केली. न्यायालयानेही रात्री दहा ते सकाळी सहा स्पीकरच्या वापराला बंदी केली आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘शाळा, रुग्णालयांसारख्या शांतता परिसराबाबतचे आदेशही मशीद व्यवस्थापकांकडून धुडकावले जातात. त्यामुळे मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर आम्ही सकाळी स्पीकरवर भजने लावू,’ असे मुतालिक यांनी म्हटले आहे.
( हेही वाचा: राऊतांनी राज्यपालांवर खालच्या भाषेत केली टीका म्हणाले…)
दोन समुदायामध्ये संघर्ष होईल
महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवण्याची मागणी केली होती; तसेच स्पीकरवर हनुमान चालिसा लावणार असल्याचे म्हटले होते. मात्र, अशा पद्धतीने थेट रस्त्यावर भिडण्याची भाषा केल्यास त्यातून दोन समुदायामध्ये संघर्ष उद्भवू शकतो. त्यामुळेच मुस्लिम बांधवांनी मशिदीपुरताच लाउडस्पीकरचा वापर केल्यास त्याचा इतर नागरिकांना त्रास होणार नाही,’ असे कर्नाटकातील मंत्री के. एस.ईश्वरप्पा म्हणाले.
Join Our WhatsApp Community