Kartar Singh : एकोणीसाव्या वर्षी फासावर चढणारे महान क्रांतिकारक कर्तार सिंह

Kartar Singh : कर्तार सिंह यांचा जन्म २४ मे १८९६ साली पंजाबमधल्या लुधियाणा गावाजवळच्या सरभा या गावातल्या एका शीख कुटुंबात झाला. 

131
Kartar Singh : एकोणीसाव्या वर्षी फासावर चढणारे महान क्रांतिकारक कर्तार सिंह
Kartar Singh : एकोणीसाव्या वर्षी फासावर चढणारे महान क्रांतिकारक कर्तार सिंह

कर्तार सिंह (Kartar Singh) हे एक भारतीय क्रांतिकारक होते. ते गदर पार्टीचे सदस्य होते. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ते गदर पार्टीमध्ये सामील झाले. त्यावेळी ते फक्त पंधरा वर्षांचे होते. पुढे कर्तार सिंह (Kartar Singh) हे गदर पार्टीचे प्रमुख सदस्य बनले. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. त्यांनी ब्रिटिशांविरुद्ध केलेल्या कामगिरीसाठी त्यांना ब्रिटिशांनी लाहोरच्या सेंट्रल जेलमध्ये डांबले आणि त्यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी कर्तार सिंह (Kartar Singh) हे फक्त एकोणीस वर्षांचे होते. (Kartar Singh)

(हेही वाचा- Lok Sabha Election मतदानासाठी दिल्ली सज्ज; प्रशासकीय यंत्रणांची कशी आहे तयारी?)

कर्तार सिंह (Kartar Singh) यांचा जन्म २४ मे १८९६ साली पंजाबमधल्या लुधियाणा (Ludhiana) गावाजवळच्या सरभा या गावातल्या एका शीख कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव मंगल सिंह गरेवाल (Mangal Singh Garewal) आणि आईचं नाव साहिब कौर (Sahib Kaur) असं होतं. कर्तार सिंह लहान असतानाच त्यांचे वडील देवाघरी गेले. त्यांच्या आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. (Kartar Singh)

कर्तार सिंह (Kartar Singh) यांचं प्राथमिक शिक्षण राहत्या गावातच त्यांनी पूर्ण केलं. पुढचं शिक्षण घेण्यासाठी त्यांनी लुधियाना इथल्या मालवा खालसा हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. तिथे त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर ते बर्कले इथे असलेल्या कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी सॅन फ्रान्सिस्को येथे गेले. पण त्या युनिव्हर्सिटीमध्ये कर्तार सिंह (Kartar Singh) यांच्या नावाची कुठलीही नोंद नव्हती. बाबा ज्वालासिंह यांच्या एका ऐतिहासिक नोंदणीमध्ये असं आढळतं की, १९१२ साली डिसेंबरमध्ये ते ओस्टोरीया, ओरेगॉन येथे गेले होते तेव्हा तिथे त्यांना कर्तार सिंह एका कारखान्यात काम करताना दिसले. (Kartar Singh)

(हेही वाचा- दरड, इमारत दुर्घटनेतील बाधितांचे तात्पुरते पुनर्वसन शाळा किंवा शेडमध्ये नको; CM Eknath Shinde यांनी काय दिले निर्देश?)

बर्कले इथल्या भारतीय विद्यार्थ्यांचा भारतातल्या नालंदा विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या क्लबशी त्यांचा संपर्क होता. त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे कर्तार सिंह यांच्यातही देशभक्तीपर भावना बळावल्या. भारतातल्या स्थलांतर झालेल्या लोकांना आणि विशेषतः मॅन्युअल कामगारांना युनायटेड स्टेट्स येथे देण्यात येणाऱ्या वागणुकीमुळे कर्तार सिंह (Kartar Singh) अतिशय अस्वस्थ झाले.

गदर पार्टीचे संस्थापक सोहन सिंग भकना यांनी कर्तार सिंग यांना भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटीश वसाहतवादी राजवटीविरुद्ध मोहीम चालवण्यास प्रेरित केलं. सोहन सिंग भकना हे कर्तार सिंहना (Kartar Singh) ‘बाबा जर्नल’ म्हणून हाक मारायचे. कर्तार सिंह (Kartar Singh) यांनी बंदूक चालवणं, स्फोटक उपकरणं बनवणं हे अमेरिकन लोकांकडून शिकून घेतलं. एवढंच नाही तर विमानं उडवण्याचे धडेही घेतले.

(हेही वाचा- Navi Mumbai: दंडात्मक कारवाई करत ३९.७५० किलो प्लास्टिक जप्त)

पण गदर पार्टीमधल्या पोलिसांच्या गुप्तहेरांनी पोलिसांना सूचना दिली तेव्हा गदर पार्टीचा बंड करण्याचा प्रयत्न फसला आणि तिथल्या क्रांतीकारकांना अटक करण्यात आली. त्यांपैकी काही जणांची काही दिवसांनी सुटका केली गेली. सुटका झालेल्या क्रांतिकारकांमध्ये कर्तार सिंह सुद्धा होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा क्रांतिकार्याला सुरुवात केली. पण यावेळी त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना ब्रिटिश पोलिसांनी पुन्हा पकडलं आणि लाहोरच्या तुरुंगात डांबलं. (Kartar Singh)

त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. कर्तार सिंह (Kartar Singh) यांनी त्या खटल्याच्या विरोधात आवाज उठवला. ते देशद्रोही नाही तर क्रांतिकारक होते. १७ नोव्हेंबर १९१५ साली कर्तार सिंह यांना फाशी देण्यात आली. हुतात्मा भगतसिंह हे कर्तार सिंह यांना आपले आदर्श मानायचे. (Kartar Singh)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.