कारुळकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत कारुळकर आणि त्यांच्या पत्नी शीतल जोशी-कारुळकर यांना वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनचे (डब्ल्यूसीएफए) कॉर्पोरेट सदस्यत्व प्रदान करण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे हा सन्मान प्राप्त होणारे ते जागतिक स्तरावरचे पहिलेच भारतीय दांपत्य ठरले आहेत.
अशी असते परिषद
यामुळे डब्ल्यूसीएफए या संस्थेच्या परिषदेत उपस्थित राहण्याची संधी कारुळकर दांपत्याला मिळणार आहे.
ही परिषद दावोस, स्वीत्झर्लंड येथे दरवर्षी भरवण्यात येते. जाहिरात, डिजिटल मार्केटिंग, मीडिया, पीआर अशा कम्युनिकेशन्स जगतातील नामवंत लोकांची या परिषदेत उपस्थिती असणार आहे. फक्त निमंत्रितांना या परिषदेचे सदस्यत्व देण्यात येते आणि त्यांना या जागतिक परिषदेला उपस्थित राहता येते.
जागतिक स्तरावर देणार नवी दिशा
प्रशांत कारुळकर हे या नव्या जबाबदारीच्या माध्यमातून वर्ल्ड कम्युनिकेशन फोरम असोसिएशनच्या कार्याला प्रथम भारतात व नंतर जागतिक स्तरावर नवी दिशा देतील. त्यातून हा मंच नवनव्या संधींसाठी खुला करण्याचा आणि नवे व्यापारी करार करण्यासाठी प्रशांत कारुळकर सहाय्य करतील, तर शीतल कारुळकर या मंचाच्या माध्यमातून संपर्क उद्योगात महिलांचा सहभाग वाढवतील. शिवाय, ‘न्यूज डंका’ सारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे प्रतिनिधित्वही या दांपत्यामुळे जागतिक स्तरावर केले जाणार आहे. प्रशांत आणि शीतल कारुळकर यांनी या संस्थेच्या सदस्यत्वाचे प्रमाणपत्र डब्ल्यूसीएफएच्या कार्यकारिणीचे नियंत्रक योगेश जोशी यांच्याकडून मिळाल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.
Join Our WhatsApp Community