कारूळकर प्रतिष्ठान निलेश तेलगडेंच्या कुटुंबासाठी बनले आधार!

कारूळकर प्रतिष्ठानने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० मध्ये निलेशच्या कुटुंबियांना रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली आणि दोन्ही मुलींची सर्व जबाबदारी स्वीकारली. मुलींना इच्छा असेल तेवढे शिक्षण घेवू द्या, त्यांच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेवू, असे आश्वासन दिले.

116

मागच्या वर्षी पालघरमध्ये २ साधूंच्या सोबत माझ्या पतीला मॉबलिचींगद्वारे ठार करण्यात आले. त्यानंतर आमचे सगळे संपले. आम्हाला कुणीही आधार उरला नाही, आमच्याकडे कुणी फिरकलेसुद्धा नाही. मी कसाबसा माझा संसाराचा गाडा हाकत आहे. अशा परिस्थितीत कारुळकर प्रतिष्ठान आमच्या मदतीला धावून आले. गेल्या वर्षी लॉकडाऊन असताना प्रतिष्ठानने आम्हाला रोख रक्कम दिली. आता माझ्या दोन्ही मुलींच्या शिक्षणाची जबाबदारीही प्रतिष्ठानने घेतली आहे, अशा शब्दांत निलेश तेलगडे यांची पत्नी पूजा तेलगडे यांनी प्रतिष्ठानचे प्रमुख प्रशांत कारूळकर यांच्या पत्नी शीतल कारूळकर यांच्या समोर भावना व्यक्त केल्या.

2 2

१६ एप्रिल २०२० या दिवशी मानवजातीला लाजवेल, अशी घटना पालघरमध्ये घडली. या भागातील कच्च्या रस्त्यावरून २ साधू आणि निलेश तेलगडे हे जात असताना अचानक ५०० जणांच्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात हे तिघे जण जागीच ठार झाले. या घटनेचे गल्लीपासून दिल्लीपर्यंत पडसाद उमटले. वृत्त वाहिन्यांवर साधूंच्या हत्येवर आरोप-प्रत्यारोप होऊ लागले, आंदोलने सुरु झाली. मात्र दुसरीकडे निलेश यांच्या घरात कुणी फिरकतसुद्धा नव्हते. या ठिकाणी त्यांची पती पूजा, आई आणि दोन लहान मुली यांचा आधार हरवला होता, त्यामुळे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता.

(हेही वाचा : राज्यभरात येत्या रविवारपासून रात्रीची जमावबंदी!)

कारूळकर प्रतिष्ठानने दिला मदतीचा हात!  

कांदिवली येथे राहणारे तेलगडे कुटुंब आजही हलाखीचे जीवन जगत आहे. निलेश तेलगडे यांची हत्या झाल्यापासून त्यांच्या कुटुंबाला कुणी वाली उरला नाही. पत्नी पूजा जमेल तसे कष्ट करून संसार चालवत आहे. साधूंची हत्या झाली म्हणून हा विषय बराच चर्चेला आला. यावर राजकीय पोळी भाजून घेण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. पण निलेश तेलगडे यांच्या मागे त्यांच्या घरातील सदस्यांना मदत करण्यासाठी कुणी पुढे आले नाही. कारूळकर प्रतिष्ठान याला अपवाद ठरले. कारूळकर प्रतिष्ठानने लॉकडाऊनच्या काळात एप्रिल २०२० मध्ये निलेशच्या कुटुंबियांना रोख रक्कम देऊन आर्थिक मदत केली आणि दोन्ही मुलींची सर्व जबाबदारी स्वीकारली. मुलींना इच्छा असेल तेवढे शिक्षण घेवू द्या, त्यांच्या शिक्षणाची आम्ही जबाबदारी घेवू, असे आश्वासन दिले.

3

कारूळकर प्रतिष्ठानने शब्द पाळला!  

या घटनेला ११ महिने उलटले, कारूळकर प्रतिष्ठानने निलेश तेलगडे यांची पत्नी, आई आणि २ मुली ह्या सर्वांना आवर्जून प्रतिष्ठानच्या बोरिवली येथील कार्यालयात बोलावले. तिथे त्यांना शीतल कारूळकर यांनी आर्थिक मदत म्हणून रोख रक्कम दिली आणि मुलींच्या शैक्षणिक खर्चासाठी मदत करत शब्द पाळला. याबद्दल बोलताना पूजा तेलगडे यांनी, मागील ११ महिने आम्हाला कुणी विचारत नव्हते. कुणी आम्हाला मदत केली नाही. आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून सावरण्यासाठी कारूळकर प्रतिष्ठानची मदत झाली. कारूळकर प्रतिष्ठानने आम्हाला बोलावले, आमची विचारपूस केली, आमच्याशी संवाद साधला, आम्हाला मदत केली, फार बरे वाटले, अशा शब्दांत त्यांनी आभार व्यक्त केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.