करवा चौथ हा एक पारंपारिक हिंदू सण आहे, जो प्रामुख्याने उत्तर आणि पश्चिम भारतातील विवाहित महिलांद्वारे साजरा केला जातो. कार्तिक महिन्यातील पौर्णिमेनंतर चौथ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या सणामध्ये महिला त्यांच्या पतीच्या कल्याणासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी दिवसभर उपवास करतात. (Karwa Chauth Wishes)
या सणानिमित्त स्त्रिया छान नटतात, बहुतेकदा वधूचा पोशाख परिधान करतात. काही धार्मिक विधी पार पाडला जातो. पूजा केली जाते. चंद्राचे दर्शन घेऊन त्याला नैवेद्य दाखवले जाते आणि त्यानंतर पतीने दिलेले पाणी आणि अन्नाचा घास घेतल्यावरच उपवास सोडला जातो. हा दिवस परंपरा, प्रेम आणि भक्तीने प्रेरित आहे. (Karwa Chauth Wishes)
(हेही वाचा – Dandiya Night मध्ये काय काय मज्जा येते?)
करवा चौथच्या दिवशी द्या मराठीत शुभेच्छा
- करवा चौथच्या निमित्ताने सुख तुमच्या दारी येवो,
प्रेम आणि आनंदाने तुमच्ये आयुष्य फुलून जावो,
करवा चौथच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा! - लग्नाच्या पवित्र नात्याने बांधली गेली जन्माची गाठ
अशीच कायम राहो, पती-पत्नीची दृढ साथ
करवा चौथच्या मनापासून शुभेच्छा! - दोन क्षणांचा असतो वाद
सात जन्मांचा असतो नाद
कितीही आले जरी संकट जरी
सोडू नकोस तू माझी साथ
करवा चौथच्या हार्दिक शुभेच्छा! - चंद्र दर्शनाने तुमचे हृदय भरून जावो,
तुमच्यावर कायम प्रेमाचा वर्षाव होवो,
हीच देवाकडे माझी प्रार्थना.
माझ्याकडून तुम्हाला करवा चौथच्या शुभेच्छा! - करवा चौथ म्हणजे नाही फक्त परंपरा,
ही आहे प्रेमळ पत्नीची पतीवरची श्रद्धा,
प्रेमाचे हे बंध सात जन्माचे
पती माझे लाख मोलाचे
करवा चौथच्या शुभेच्छा पतीराज! - सण सौभाग्यचा..
बंध अतूट नात्याचा
या मंगलदिनी पूर्ण होवोत
तुमच्या सर्व इच्छा
करवा चौथ सणाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! - यशस्वी विवाहासाठी
अनेक वेळा त्याच व्यकीच्या
प्रेमात पडणे आवश्यक असते.
आणि करवा चौथ म्हणजे
आपल्या पतीवर प्रेम करण्याचा पवित्र दिवस.
करवा चौथाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!हेही पहा –