ज्ञानव्यापी परिसर काशी विश्वनाथ मंदिराचीच संपत्ती! काय आहेत यासंबंधीचे ‘ते’ मुद्दे? वाचा… 

श्री काशी विश्वनाथ मंदिराच्या पंचक्रोशीतील ज्ञानव्यापी परिसराच्या मालकी हक्काबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे. प्रत्यक्षात मात्र हा परिसर श्री काशी विश्वनाथ मंदिराचीच संपत्ती आहे, तसे पुरावे इतिहासात उपलब्ध आहेत. जरी तुर्कस्थानातून आलेला कुतुबुद्दीन ऐबक नंतर औरंगजेबाने श्री काशी विश्वनाथ मंदिरावर हल्ला केला, तरी आजही या परिसरात हिंदू धर्मीय पूजाअर्चा करतात, धार्मिक संस्कार पार पडतात.  

श्री काशी विश्वनाथ मंदिराचा अर्धा हिस्सा असलेला ज्ञानव्यापी परिसर सध्या खिंडार बनलेला आहे, त्याच्या मालकी हक्काचा विषय पुन्हा एकदा न्यायालयात पोहचला आहे. या मंदिरावर आणि परिसरावर परकीयांनी आक्रमणे केली होती, आता ती जागा वक्फ बोर्डाच्या मालकीचा करण्याचा घाट घातला जात आहे. त्याविरोधात देशभरातील हिंदुत्वनिष्ठ न्यायालयीन लढ्यात उतरले आहेत.

ज्यामध्ये देशभरातील दहा हिंदुत्वनिष्ठ आणि अधिवक्ता यांनी वाराणसी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत इक्कजुट्ट जम्मूचे अध्यक्ष आणि वरिष्ठ वकील अंकुर शर्मा, ऍड. श्री हरी शंकर जैन, जितेंद्र सिंह विसेन, अधिवक्ता रंजना अग्निहोत्री यांच्यासह दहा जणांचा समावेश आहे. या याचिकेत ज्ञानव्यापी परिसर हा श्रीकाशी विश्वेश्वर मंदिराचाच भाग आहे, हे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात भारत सरकार, उत्तर प्रदेश सरकार, जिल्हाधिकारी वाराणसी, पोलीस अधीक्षक वाराणसी, सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड, अंजुमन इंताजामिया मस्जिद कमिटी आणि ट्रस्ट ऑफ काशी विश्वनाथ मंदिर यांना प्रतिवादी बनवण्यात आले आहे.

(हेही वाचा : अजानच्या आवाजाने एकाग्रता जाते, गोव्यात मशिदीच्या भोंग्याचा आवाज न्यायालयाने दाबला!)

कोणते मुद्दे मांडले आहेत या याचिकेत? 

मंदिराचा पंचक्रोशीपर्यंतचा परिसर पौराणिक – आदिविश्वेश्वर मंदिराच्या पंचक्रोशीतील संपूर्ण क्षेत्र हे पौराणिक आहे. इथे माता शृंगार गौरी ही स्वयंभू देवता विराजमान आहे. प्राचीन काळापासून त्या देवीची पूजा केली जाते, तसा उल्लेख स्कंद आणि शिव पुराणात आढळून येतो.

सत्तांधवृत्तीतून मंदिरावर परकीय आक्रमण – इ.स. १६६९ मध्ये औरंगजेबने मंदिराचा काही भाग सत्तांधवृत्तीपोटी उद्ध्वस्त केला होता. वास्तविक या मंदिराच्या पंचक्रोशीत हिंदू देवतांची मंदिरे आहेत. अशा वेळी तिथे कुठल्या तरी भागात नंतरच्या काळात उभारलेल्या बांधकामाला मस्जिद म्हणून मान्यता देता येणार नाही.

वक्फ बोर्डाचा ताबा बेकायदेशीर – मंदिराचा उद्ध्वस्त केलेला भूभाग वक्फ बोर्डाच्या ताब्यात देता येणार नाही, ते बेकायदेशीर ठरेल. तसेच या क्षेत्रावर मुसलमानांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे मंदिराच्या कोणत्याही भागाचा उपयोग करण्याचा अधिकार मुसलमानांना असू शकत नाही.

पूजा स्थळ अधिनियम लागू नाही ! – या मंदिराला पूजा स्थळ अधिनियम १९९१ हा कायदा लागू होत नाही. इथे कायम पूजा होत आहे. जी १९४७ पासून सुरु आहे.

धार्मिक स्वातंत्र्याचे हनन – अनुच्छेद २५च्या अंतर्गत संविधानाने प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माला मानणे, त्याचे आचरण करणे तथा धर्माचा प्रचार करणे याचे स्वातंत्र्य दिले आहे, ज्ञानव्यापी परिसरात हिंदूंच्या बाबतीत याचे उल्लंघन होत आहे.

मुसलमानांकडून अतिक्रमण –  ‘श्री काशी विश्वनाथ अधिनियम १९८३’ कायद्यात जुन्या मंदिरांमध्ये ज्योतिर्लिंग आणि आदिविश्वेश्वर यांचे अस्तित्व मान्य केले आहे. त्यामुळे या क्षेत्रात मुसलमानांना अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here