कुलगाममधील हायस्कूलमध्ये दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित महिला शिक्षिकेवर झाडली गोळी

103

जम्मू-काश्मीरमधील कुलगाममधील गोपालपोरा भागात दहशतवाद्यांनी हायस्कूलच्या महिला शिक्षिकेवर गोळ्या झाडल्या. दहशतवाद्यांनी शाळेत घुसून या महिलेला गोळी झाडली आहे. महिला शिक्षिका गंभीर जखमी झाली असून, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला. ही महिला काश्मीरी पंडित असल्याचे समोर आले आहे.  काश्मीर झोन पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून शोध मोहीम सुरू केली आहे.

( हेही वाचा: ‘विभास साठे’ यांचा मनसुख हिरेन होऊ नये, त्यांना सुरक्षा द्या; सोमय्यांचे पोलीस महासंचालकांना पत्र )

याआधीही घडल्यात अशा घटना

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे भ्याड कृत्य सुरू आहे. यापूर्वी स्थानिक टीव्ही अभिनेत्री अंबरीन यांची दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या हल्ल्यात त्यांचा १० वर्षांचा भाचाही गंभीर जखमी झाला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी टीव्ही अभिनेत्री अंबरीन भटच्या हत्येचा 24 तासांत उकल करण्याचा दावा केला होता. दुसरीकडे, ऑक्टोबर 2021 मध्ये, दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या इदगाह परिसरात एका महिलेसह सरकारी शाळेतील दोन शिक्षकांची गोळ्या झाडून हत्या केली होती. शाळेच्या मुख्याध्यापिका सुपिंदर कौर आणि काश्मिरी पंडित शिक्षक दीपक चंद अशी मृतांची नावे आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.