काश्मीरच्या निसर्गसौंदर्याची पर्यटकांना भुरळ, तीन महिन्यांत साडेतीन लाख पर्यटकांनी दिली भेट

79
काश्मीरमध्ये दहशतवादी काश्मिरी पंडितांना ठार करत आहेत, असे वृत्त येत आहेत. त्यामुळे काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर तेथील नागरिक असुरक्षित बनले आहेत, अशी एका बाजूला टीका होत असताना, दुसऱ्या बाजूला हे कलाम हटवल्यानंतर खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. कारण मागील तीन महिन्यांत काश्मीरमध्ये पर्यटकांनी भेट देण्याच्या संख्येने विक्रम मोडला आहे. मागील तीन महिन्यांत काश्मीर खोऱ्याला ३ लाख ५० हजाराहून अधिक पर्यटकांनी भेट दिली. मार्च महिन्यात सर्वाधिक १.८ लाख पर्यटक आले आणि एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात जवळपास ५८ हजार पर्यटक काश्मीरमध्ये आले.

कलम ३७० हटवल्यावर झाला बदल 

काश्मीरमधील हे वातावरण भारतीय नागरिकांसाठी चांगले आहे, पण दहशतवाद्यांसाठी अत्यंत त्रासदायक आहे. हा बदल कलम ३७० हटवल्यानंतर साध्य झाला आहे. काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे सरकारला आता श्रीनगर विमानतळावरून विमान उड्डाणाची संख्या वाढवावी लागली आहे. २२ मे २०२२ रोजी श्रीनगर येथे एकूण ८५ विमाने उतरली, त्यातून १५ हजार प्रवासी श्रीनगर येथे आली, त्यातील ७ हजार ७६२ प्रवासी हे प्रथमच श्रीनगर येथे पोहचले होते. १७ मे २०२२ रोजी १८ हजार प्रवासी श्रीनगरमध्ये आले होते. सध्या श्रीनगर विमानतळावरून दररोज सरासरी ८० ते ९० विमानांची उड्डाणे होतात.

सर्व हॉटेल्स फुल्ल 

एप्रिलच्या शेवटच्या ७ दिवसांत ५८ हजार पर्यटक काश्मीरमध्ये आले. मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ट्युलिप गार्डन उघडण्यात आले आणि 2 एप्रिल रोजी या बागेत ५० हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. पर्यटन उपसंचालक अहसान उल हक यांनी सांगितले की, ‘जानेवारी महिन्यात आमच्याकडे जवळपास ६०,००० पर्यटक आले होते. फेब्रुवारीमध्ये ते १ लाखावर गेले आणि मार्चमध्ये १ लाख ८० हजार पर्यटकांनी विक्रमी नोंद केली. एप्रिलच्या शेवटच्या ७ दिवसात आपल्याकडे आधीच ५८ हजार पर्यटकांची आवक झाली आहे. दररोज सुमारे ८ हजार पर्यटकांची आवक होत आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत ३ लाखांचा आकडा पार केला आहे. भविष्यात आणखी पर्यटक येतील अशी आमची अपेक्षा आहे. ट्यूलिप गार्डनला आतापर्यंत सुमारे ३ लाख पर्यटकांनी भेट दिली आहे. पर्यटन विभागाचे म्हणणे आहे की आकडेवारी पाहता, असे दिसते की उद्यानात लोकांच्या गर्दीचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडले जातील. घाटीतील ट्रॅव्हल एजंट्सचे म्हणणे आहे की सर्व पंचतारांकित आणि फॉर स्टार हॉटेल भरलेली आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.