काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांची जम्मू आणि काश्मिरातील बडगाम येथील तहसील कार्यालयात दहशतवाद्यांनी हत्या केली. त्याविरोधात शुक्रवारी, १३ मे २०२२ रोजी काश्मिरी पंडितांचा बडगाममध्ये निषेध सुरु आहे. या हत्येमागील पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. पतीच्या जीवाला धोका असूनही त्यांना सुरक्षा देण्यात आली नसल्याचा आरोप केला आहे.
शुक्रवारी बडगाममध्येही निदर्शने
आपण पतीशी हत्येच्या १० मिनिटे आधी संवाद साधला होता. सगळ्यांना राहुल यांचे कौतुक वाटायचे, त्यांचा सन्मान करायचे, तुझ्याशिवाय बडगाम अपूर्ण वाटते, आसेतू म्हणायचे. विशेष म्हणजे आपण राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते. मी आता एकटीच राहिली आहे, असेही राहुल भट्ट यांची पत्नी म्हणाली. माझ्यासोबत कोणीच नाही आहे. राहुलच माझे सर्वस्व होते. राहुल भट्ट यांच्यासोबत सुरक्षा कर्मचारी नव्हते. बडगाममध्ये आंदोलन सुरूच आहे. त्याचवेळी या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी, असे राहुल भट्टचे वडील म्हणाले. कटाचा भाग म्हणून हा प्रकार घडला. काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येविरोधात शुक्रवारी बडगाममध्येही निदर्शने झाली.
(हेही वाचा शिवसेनेच्या हिंदुत्वावरील बॅनरबाजीवर भाजपचे टीकास्त्र )
Join Our WhatsApp Community