अरविंद मिल्सचे सर्वेसर्वा उद्योगपती Kasturbhai Lalbhai

194
कस्तुरभाई लालभाई (Kasturbhai Lalbhai) हे भारतीय उद्योगपती होते. त्यांनी आपल्या भावंडांसोबत आणि इतर अनेक संस्थांसोबत मिळून अरविंद मिल्सची स्थापना केली होती. ते अहमदाबाद एज्युकेशन सोसायटीचे सह-संस्थापक होते. याद्वारे त्यांनी अहमदाबाद विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची स्थापना केली.
कस्तुरभाईंचा (Kasturbhai Lalbhai) जन्म १८९४ मध्ये झवेरीवाड, अहमदाबाद येथे झाला. त्यांच्या आईचे नाव मोहिनी आणि वडिलांचे नाव लालभाई दलपतभाई. ते प्रमुख जैन कुटुंब होते. अहमदाबादच्या तीन दरवाजाजवळील महापालिका शाळेत त्यांनी पाचव्या इयत्तेपर्यंत शिक्षण घेतले.
नंतर ते रणछोडलाल छोटेलाल सरकारी हायस्कूलमध्ये दाखल झाले. १९११ मध्ये ते द्वितीय श्रेणीने मॅट्रिक पास झाले. १९१२ मध्ये गुजराती महाविद्यालयात शिकत असताना ते १७ वर्षांचे असताना त्यांचे वडील वारले. त्यामुळे कौटुंबिक व्यवसायात मदत करण्यासाठी त्यांना शिक्षण सोडावे लागले.
१९१२ मध्ये ते रायपूर मिलचे अध्यक्ष म्हणून काम करु झाले. १९१८ मध्ये ते रायपूर मिलच्या संचालक मंडळात सामील झाले. नंतर त्यांनी दह्याभाई पटेल यांच्या मदतीने १९२० मध्ये अशोका मिल्सची स्थापना केली. १९३१ मध्ये त्यांनी अरविंद मिल्स आणि नूतन मिल्सची स्थापना केली. त्यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात सर्व मिल्सचे आधुनिकीकरण केले. १९३९ मध्ये ते भारतातील सर्वोच्च सातव्या क्रमांकाचे कापूस निर्माते होते.
उद्योगासोबत त्यांनी समाजकार्यातही काम केले आहे. आनंदजी कल्याणजी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी ५० वर्षे काम केले. त्यांच्या योगदानासाठी त्यांना भारत सरकारने १९६९ साली पद्मभुषण देऊन त्यांचा सन्मान केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.