कतरिना कैफला धमकावणारा अटकेत

बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ हिच्यासोबत त्याला लग्न करायचे होते, परंतु ते होऊ शकले नाही म्हणून त्याने कतरिना कैफ आणि तिचा पती विकी कौशल यांना सोशल मीडियावर फॉलो करून धमकी देत होता. रविवारी रात्री विकी कौशल याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सोमवारी पोलिसांनी कतरीनाचा चाहता असलेल्या मनविंदर सिंग याला अटक केली आहे.

(हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडण्यामागे काय आहेत कारणे आणि कोण आहेत जबाबदार?)

मनविंदर सिंग हा चित्रपट सृष्टीत स्ट्रगल कलाकार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच तो कतरीना कैफ हिचा चाहता असून त्याला कतरिना सोबत लग्न करायचे होते. त्यासाठी त्याने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. मात्र कतरीनाने विकी कौशिक सोबत लग्न केल्यामुळे मनविंदरला नैराश्य आले होते. या नैराश्यातून त्याने कतरिनाला सोशल मीडियावर त्रास देण्यास सुरुवात केली होती, तो कतरिना आणि त्याचा फोटो एकत्र करून इन्स्टाग्रामवर टाकत होता, कतरिनाला सोशल मीडियावर धमकी देत होता.

मागील काही दिवसापासून हा प्रकार वाढल्यानंतर विकी कौशिक याने त्याला समजावले होते. मात्र त्याने हा प्रकार सुरूच ठेवत दोघांना धमकी देत होता, अखेर विकी कौशिक याने सांताक्रूझ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. रविवारी रात्री पोलिसांनी गुन्हा दाखल सोमवारी दुपारी पोलिसांनी त्याला पश्चिम उपनगरातून अटक केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here