Kavi Kant : मणिशंकर रतनजी भट्ट म्हणजेच सुप्रसिद्ध कवी कांत

कवी कांत हे हे गुजराती कवी, नाटककार आणि निबंधकार होते. त्यांचे पूर्वलप हे पुस्तक गुजराती कवितेतील एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो.

375
Kavi Kant : मणिशंकर रतनजी भट्ट म्हणजेच सुप्रसिद्ध कवी कांत
Kavi Kant : मणिशंकर रतनजी भट्ट म्हणजेच सुप्रसिद्ध कवी कांत

कवि कांत यांचा जन्म २० नोव्हेंबर १८६७ रोजी बडोदा राज्यातील अमरेली प्रांतातील चावंड या गावी झाला. (Kavi Kant) ते प्रश्नोरा ब्राह्मण कुटुंबातले होते. मोतीबेन आणि रत्नाजी भट्ट हे त्यांचे पालक. कौटुंबिक वातावरणामुळे शिक्षण आणि तत्वज्ञान या विषयात त्यांना आवड निर्माण झाली.

विशेष म्हणजे हिंदू ग्रंथ आणि बायबल या दोन्ही तत्त्वज्ञानाचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण मंगरोळ, मोरबी आणि राजकोट येथे झाले. त्यांनी १८८८ मध्ये मुंबई विद्यापिठातून तर्कशास्त्र आणि नैतिक तत्त्वज्ञान हे विषय घेऊन कला शाखेची पदवी प्राप्त केली. १८८९ मध्ये त्यांनी सुरत येथे शिक्षक म्हणून काम केले. (Kavi Kant)

(हेही वाचा – ICC Cricket World Cup : या विश्वचषकात भारत प्रथमच ऑलआऊट)

कवी कांत हे हे गुजराती कवी, नाटककार आणि निबंधकार होते. त्यांचे पूर्वलप हे पुस्तक गुजराती कवितेतील एक महत्त्वाचा ठेवा मानला जातो. १८९० ते १८९८ दरम्यान त्यांनी कलाभवन, वडोदरा येथे प्राध्यापक आणि नंतर उपप्राचार्य म्हणून काम केले. त्यांनी खंड-काव्य या कवितेचा प्रकार शोधून काढला.

सलीमशहा अथवा आश्रुमती, रोमन-स्वराज्य, दुखी संसार आणि गुरु गोबिंदसिंह ही नाटके देखील त्यांनी लिहिली. १८९१ मध्ये त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यामुळे कवी कांत यांच्या मनावर परिणाम झाला. त्यांना वाटू लागले की, आपल्या धर्मात जीवनाच्या सत्याचे उत्तर मिळत नाही. म्हणून त्यांनी १८९८ मध्ये ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांचे कुटुंब आणि मित्रांनी त्यांच्या निर्णयाला विरोध केला. (Kavi Kant)

(हेही वाचा – LCA MARK 2 : लढाऊ विमाननिर्मितीत भारताचे मोठे पाऊल; अमेरिकेसोबत करणार ‘ही’ निर्मिती)

सार्वजनिक आणि राजकीय विरोधामुळे त्यांना भावनगर राज्यातील शिक्षण मंत्रीपद सोडावे लागले. ते १९२३ मध्ये काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. रावळपिंडीहून लाहोरला ट्रेनने परतत असताना १६ जून १९२३ रोजी वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. (Kavi Kant)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.