Kerala Boat Tragedy: केरळमध्ये बोट उलटल्याने २१ पर्यटकांचा मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरुच

230
Kerala Boat Tragedy: केरळमध्ये बोट उलटल्याने २१ पर्यटकांचा मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरुच
Kerala Boat Tragedy: केरळमध्ये बोट उलटल्याने २१ पर्यटकांचा मृत्यू; अजूनही बचावकार्य सुरुच

केरळच्या मलप्पुरम जिल्ह्यात हाऊसबोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. माहितीनुसार, २५हून अधिक लोक घेऊन जाणारी हाऊसबोट उलटल्याने आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना तन्नूरच्या तूवल तेरम पर्यटनस्थळावर रविवारी, ७ मेला संध्याकाळी सात वाजता घडली. प्रादेशिक अग्निशमन दलाचे अधिकारी शिजू केके यांनी सांगितले की, आतापर्यंत २१ जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच अजूनही बोटीमध्ये बसलेल्या लोकांची संख्या समजली नसून यासाठी सध्या सर्च ऑपरेशन सुरू आहे.

केरळमधील या दुर्घटनेनंतर आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी मध्यरात्री राज्याच्या आरोग्य विभागाची तातडीने बैठक बोलावली. यावेळी त्यांनी जखमी झालेल्या लोकांना चांगलेच उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. तसेच मृताच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया वेगाने करण्याचेही निर्देश दिले. सोमवारी, ८ मेला सकाळी सहा वाजल्यापासून शवविच्छेदन सुरू करण्यास आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते.

(हेही वाचा – पुलवामा: ‘आयईडी’सह दहशतवाद्याला अटक; पोलिसांनी उधळून लावला घातपाताचा कट)

केरळमधील दुर्घटनेबाबत पंतप्रधान मोदींनी केला शोक व्यक्त

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक केला आणि मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली.

तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करत जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी प्रार्थना केली. यापूर्वी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी देखील ट्वीट करून शोक व्यक्त केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.