केरळमधील पल्लकड येथे दोन बसची जोरदार धडक; अपघातात 9 ठार, तर 38 जखमी

177

केरळच्या पल्लकड जिल्ह्यात दोन बसची धडक झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला तर 38 जण जखमी झाले आहेत. पल्लकड जिल्ह्यातील वडक्केनचेरी येथे हा अपघात झाला. केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळ (KSRTC) बसची पल्लकड जिल्ह्यातील वडक्केनचेरी येथे एका पर्यटक बसला टक्कर झाली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झााल, तर 38 जखमी झाले.

केरळमधील वडक्कनचेरी जवळील मंगलम येथे बुधवारी रात्री शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या बसने KSRTC बसला पाठीमागून धडक दिली. धडकेनंतर बस दलदलीमध्ये कोसळली. यामध्ये 9 जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. सुमारे 38 जखमींना विविध रुग्णालयात उपचारांसाठी दाखलकरण्याता आले आहे. अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

( हेही वाचा: “वेदांता प्रकल्पात टक्केवारी मागितली हे सिद्ध करुन दाखवा”; अजित पवारांचे शिंदेंना आव्हान )

बुधवारी रात्री 11:30 च्या सुमारास केरळमध्ये असणा-या राष्ट्रीय महामार्गावर 544 ( NH-544) वर हा अपघात झाला. एर्नाकुलम येथील बॅसिलिओस विद्यानिकेतन वरिष्ठ माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना घेऊन एक बस उटीच्या दिशेने निघाली होती. KSRTC सुपरफास्ट बस कोट्टारक्कराहून कोईम्बतूरला जात होती. दोन्ही बस एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.